LMOTY 2026: "वैयक्तिक स्वार्थासाठी कधी तडजोड केली नाही, करणार नाही..."; 'लोकमत'च्या महासोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 21:20 IST2026-03-10T21:12:33+5:302026-03-10T21:20:58+5:30

lokmat maharashtrian of the year awards 2026: मी माझ्या जीवनात अनेकदा तडजोडी केल्या. पण मी माझ्या वैयक्तिक हितसंबंधांसाठी, माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी कधीही तडजोड केली नाही. आजपर्यंत केलंलं नाही आणि पुढेही करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात अभिनेता आमीर खान याने घेतलेल्या मुलाखतीमध्ये मांडली. 

LMOTY 2026: ''I have made compromises many times in life. But I have never compromised for personal gain', Chief Minister Devendra Fadnavis's big statement | LMOTY 2026: "वैयक्तिक स्वार्थासाठी कधी तडजोड केली नाही, करणार नाही..."; 'लोकमत'च्या महासोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे विधान

LMOTY 2026: "वैयक्तिक स्वार्थासाठी कधी तडजोड केली नाही, करणार नाही..."; 'लोकमत'च्या महासोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे विधान

मी माझ्या जीवनात अनेकदा तडजोडी केल्या. पण मी माझ्या वैयक्तिक हितसंबंधांसाठी, माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी कधीही तडजोड केली नाही. आजपर्यंत केलंलं नाही आणि पुढेही करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात अभिनेता आमीर खान याने घेतलेल्या मुलाखतीमध्ये मांडली. 

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रख्यात अभिनेता आमिर खान याने घेतलेली महामुलाखत ही विशेष आकर्षणाचा केंद्र ठरली. यावेळी आमीर खान याने तुम्ही कमी वयात नगरसेवक बनलात. त्यावयात आपल्या मनात आदर्शवादाची भावना खूप असते. आता तुम्ही तुमचा राजकीय प्रवास पाहता तेव्हा या काळात तुम्ही आदर्शवादापासून केलेली सुरुवात कुठपर्यंत पोहोचली आहे, असे विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले,  ‘’मी एक सांगेन की, बदलल्या काळासोबत तुम्हाला आदर्शवादबाबतची यतार्थता समजते. परिस्थितीही बदलते. कधीकधी तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागतात. पण  आदर्शवादाला कधी संपुष्टात आणू नका, या मताचा मी आहे. कारण आदर्शवाद मेला तर तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये काही उरत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

ते पुढे म्हणाले की, मी माझ्या जीवनासाठी काही तत्त्वं आखली आहेत. त्या आधारावर मी जगण्याचा प्रयत्न करतो. पण सोबतच मी व्यवहारवादीही आहे.  कारण मतांच्या राजकारणामध्ये आणि लोकशाहीमध्ये जर तुम्ही निवडून आलात तर तुम्ही जे करू इच्छिता, जो बदल घडवून आणू इच्छिता आणि जी जो आदर्शवाद व्यवहारात आणू इच्छिता तो तुम्ही आणू शकता.  मी असे अनेक जण पाहिले आहेत ज्यांनी वेळेची गरज ओळखलेली नाही आणि ते संपले. ते स्वत:मध्ये बदल घडवून आणू शकले नाहीत. मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा मी ज्या आदर्शवादाला घेऊन आलो होतो. त्याला १०० टक्के सोबत घेऊन जगू शकलो नाही, असे मला वाटते, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

यावेळी फडणवीस पुढे म्हणाले की, मी माझ्या जीवनात अनेकदा तडजोडी केल्या. पण मी माझ्या वैयक्तिक हितसंबंधांसाठी, माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी कधीही तडजोड केली नाही. आजपर्यंत केलंली नाही आणि पुढेही करणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.    

Web Title : LMOTY 2026: व्यक्तिगत स्वार्थ के लिए कभी समझौता नहीं किया: फडणवीस

Web Summary : फडणवीस ने कहा कि उन्होंने जीवन में समझौते किए, लेकिन व्यक्तिगत लाभ के लिए कभी नहीं। आमिर खान के साथ लोकमत के कार्यक्रम में बोलते हुए, उन्होंने बदलते समय के बावजूद सिद्धांतों को बनाए रखने, राजनीति में आदर्शवाद को व्यावहारिकता के साथ संतुलित करने पर जोर दिया।

Web Title : LMOTY 2026: Never compromised for personal gain, says Fadnavis.

Web Summary : Fadnavis stated he's made compromises in life but never for personal gain. Speaking at Lokmat's event with Aamir Khan, he emphasized upholding principles despite changing times, balancing idealism with practicality in politics.