शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आजी-माजी खासदारांचे जयंतरावांना थेट आव्हान

By admin | Updated: September 25, 2014 23:26 IST

इस्लामपूर मतदारसंघ : विरोधकांच्या गोधडीला बळकटी येणार?

अशोक पाटील - इस्लामपूर -इस्लामपूर मतदारसंघात माजी खासदार प्रतीक पाटील यांनी ‘एन्ट्री’ करून वसंतदादा घराण्यावर वार करणाऱ्या जयंत पाटील यांना नमविण्याचा जणू विडा उचलला आहे. त्यांनी थेट काँग्रेस आघाडीविरोधातील खासदार राजू शेट्टी यांच्याशी हातमिळवणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने जशा आघाडी धर्माला वाटण्याच्या अक्षता लावल्या, तशाच तेही लावत आहेत. मात्र महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांचा कुणाचा पायपोस कुणाला नाही. सध्या विरोधकांची अवस्था फाटलेल्या गोधडीसारखी झाली आहे. ती बळकट होणार का, हा प्रश्न आजतरी अनुत्तरित आहे.ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या विरोधातील सर्वच नेत्यांना एकत्र करून एकास एक लढत देण्यासाठी काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी पुढाकार घेतला आहे; परंतु उमेदवार कोण, यावर अद्याप एकमत झालेले नाही. मोदींच्या लाटेवर निवडून येण्याच्या मृगजळामागे लागलेले अभिजीत पाटील, बी. जी. पाटील, जितेंद्र पाटील, विक्रमभाऊ पाटील, भीमराव माने यांनी शड्डू ठोकले आहेत, तर जयंतरावांच्या ताकदीपुढे केवळ आपणच साम, दाम, दंड, भेद ही अस्त्रे वापरू शकतो, असे सांगणारे नानासाहेब महाडिक ‘मातोश्री’वरील वाऱ्या करून थकले आहेत. त्यांनी आता राजू शेट्टी आणि प्रतीक पाटील यांनी बांधलेल्या मोटेचा आधार घेणे पसंद केले आहे.प्रतीक पाटील यांच्या ‘एन्ट्री’नंतर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, जितेंद्र पाटील, वैभव पवार यांनी भाजपचे बाबासाहेब सूर्यवंशी, विक्रमभाऊ पाटील, शिवसेनेचे आनंदराव पवार, स्वाभिमानीचे अभिजीत पाटील, बी. जी. पाटील आणि हुतात्मा संकुलाचे वैभव नायकवडी यांच्याशी हातमिळवणी केली आहे. मात्र त्यांच्यातील विंचूदोषावर आजी-माजी खासदार रामबाण उपाय योजू शकतील का, याबाबत साशंकता आहे. त्यावरच या लढतीची गणिते ठरणार आहेत.जयंत पाटील  --प्रतीक पाटील---राजू शेट्टी खा. राजू शेट्टी यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात खमक्या उमेदवार म्हणून नानासाहेब महाडिक यांना पसंती दिली आहे. त्यांना महायुतीची उमेदवारी मिळावी यासाठी शेट्टी यांनीच प्रयत्न सुरू केले, परंतु महायुतीतील घोळामुळे खा. शेट्टी व महाडिक गट मुंबईतून परतले. महायुती तुटल्याने महाडिक यांना ‘स्वाभिमानी’ची उमेदवारी देण्यात येणार असल्याचे समजते.