शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

शुक्रवारी राज्यात तुरळक पावसाची शक्यता ; हवामान विभागाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 20:24 IST

उत्तरेकडील वाऱ्यांच्या दबावामुळे राज्यात तापमानात घट झाली असून येत्या शुक्रवारी राज्यातील काही भागांमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे.

पुणे : उत्तर भारतातील थंड हवेचा प्रभाव वाढल्याने सोमवार रात्रीपासून राज्यातील किमान तापमानात घसरण झाली असून मंगळवारी दिवसाच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाल्याचे दिसून आले आहे. मंगळवारी रात्रीच्या तापमानात आणखी किंचित घट होण्याची शक्यता आहे. हा परिणाम बुधवार दुपारपर्यंत राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील वाऱ्यांच्या दबावामुळे राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे 13 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तर मुंबईत सांताक्रुझ येथे सर्वाधिक कमाल तापमान 37.4 अंश सेल्सिअसची नोंद झाली़ राज्यात येत्या 29 फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उन्हाळा सुरु झाला असे संकेत वातावरण देत असतानाच अचानक सोमवारी रात्रीपासून थंड वारे वाहू लागले. मध्य महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणच्या मंगळवारच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाल्याचे दिसून आले आहे. तसेच विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. याबाबत पुणेहवामान विभागाचे प्रमुख डॉ़ अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, वातावरणातील खालच्या स्तरावर उत्तरेकडील थंड हवेचा प्रभाव सोमवारी सायंकाळनंतर अचानक वाढला. त्यामुळे राज्यातील तापमानात विशेषत: मध्य महाराष्ट्र व विदर्भातील बहुतांश ठिकाणच्या कमाल व किमान तापमानात घट झाली आहे. त्यात मंगळवारी रात्रीही आणखी किंचित घट होण्याची शक्यता आहे. हा प्रभाव बुधवारी दुपारपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर तापमानात वाढ होत जाईल. फेब्रुवारीच्या अखेरच्या दिवशी 28 व 29 फेब्रुवारीला राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान असेल. तसेच तुरळक ठिकाणी पावसाची एखाद दुसरी सर येण्याची शक्यता आहे.

28 फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. 29 फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.२९ फेबुवारी रोजी सातारा, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे. तर औरंगाबाद, बीड, परभणी, पुणे, गोंदिया या जिल्ह्यात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :weatherहवामानPuneपुणेRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र