शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

राज पुरोहित आणि वाहतूक पोलिसात शाब्दिक चकमक

By admin | Updated: September 5, 2016 04:55 IST

भाजपाचे आमदार राज पुरोहित यांची गाडी पार्किंग करण्यास मज्जाव करणाऱ्या पोलिसाशी शाब्दिक चकमक उडाली.

मुंबई : भाजपाचे आमदार राज पुरोहित यांची गाडी पार्किंग करण्यास मज्जाव करणाऱ्या पोलिसाशी शाब्दिक चकमक उडाली. ही घटना शनिवारी रात्री पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यासमोर घडली. याबाबत पोलीस ठाण्यात कसलीही नोंद करण्यात आलेली नाही. याबाबत सोशल मीडियावरून राज पुरोहित यांनी शिवीगाळ केल्याचे आणि त्यांचा निषेध करणारे संदेश दिवसभर व्हायरल झाले होते, मात्र पुरोहित यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप फेटाळला आहे.रात्री ८च्या सुमारास एल.टी. मार्ग पोलीस ठाण्याजवळ पुरोहित यांच्या चालकाने कार पोलीस ठाण्यासमोर पार्क केली. त्यामुळे परिसरातील वाहतुकीला अडथळा होऊ लागला. त्यामुळे तेथे ड्युटीवर असलेल्या एका पोलिसाने चालकाला गाडी बाजूला लावण्याची सूचना केली. त्यामुळे पुरोहित यांनी गाडीतून बाहेर येत ‘हिंमत असेल तर भेंडी बाजारात जाऊन तेथील वाहतूक सुरळीत करा, मी आमदार आहे. प्रसंगी पोलीस स्टेशनमध्येच गाडी पार्क करेन,’ असे पोलिसाला सांगितले. पुरोहित यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे कॉन्स्टेबल गडबडून गेला.(प्रतिनिधी)>शिवीगाळ केली नाही- राज पुरोहितपिकेट रोडवरील हनुमान मंदिरात दर्शनासाठी आलो होतो. तिथे पार्किंगसाठी जागा असतानाही पोलिसांनी गाडी लावण्यास मनाई केली. असे मनाई करण्याचे कारण काय, या प्रश्नाला पोलिसांना उत्तर देता आले नाही. त्याचवेळी तेथे बाइकस्वार विरुद्ध दिशेने गाडी चालवित होते. भेंडीबाजारमधील आणि अन्य ठिकाणच्या सामान्य नागरिकांसाठी वेगवेगळे नियम आहेत का, असा सवाल मी केला, असे राज पुरोहित यांनी स्पष्ट केल.