शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

न झालेल्या १९ बढत्यांची यादी पोलिसांच्या वेबसाइटवर

By admin | Updated: July 18, 2015 02:43 IST

लिपिक ते कार्यालय अधीक्षक पदांवर काम करणाऱ्या १९ कर्मचाऱ्यांच्या न झालेल्या बढत्यांची यादी गेल्या शुक्रवारी महाराष्ट्र पोलीस दलाची वेबसाईट असलेल्या महापोलीस डॉट कॉमवर गुरुवारी जाहीर झाली.

राजेश निस्ताने , यवतमाळलिपिक ते कार्यालय अधीक्षक पदांवर काम करणाऱ्या १९ कर्मचाऱ्यांच्या न झालेल्या बढत्यांची यादी गेल्या शुक्रवारी महाराष्ट्र पोलीस दलाची वेबसाईट असलेल्या महापोलीस डॉट कॉमवर गुरुवारी जाहीर झाली. आता ही यादी रद्द करून ती कशी आणि कुणी जाहीर केली, याचा तपास पोलीस महासंचालक कार्यालयाने सुरू केला आहे.पोलिसांच्या बदल्या, बढत्या व प्रत्येक फेरबदलाबाबत ही वेबसाईट अपडेट केली जाते. बदल्यांच्या हंगामात तर पोलीस यंत्रणा क्षणोक्षणी यादी जाहीर झाली का म्हणून ही वेबसाईट लॉगआॅन करतात. या वेबसाईटवर येणारी प्रत्येक माहिती अधिकृतच असते. मात्र पोलीस यंत्रणेचा हा समज गुरुवारी खोटा ठरला. लिपिकांना कार्यालय अधीक्षकपदी तात्पुरती बढती देणारे आदेश १० जुलैला महापोलीस डॉट कॉमवर जारी करण्यात आले होते. १९ लिपिकांची ही यादी होती. त्यांच्या नियुक्तीची ठिकाणेही दर्शविली गेली होती. एवढेच नव्हेतर, या लिपिकांच्या पदोन्नतीवर यापूर्वी झालेल्या बदल्यांची ठिकाणे नव्याने त्यांच्या सोयीने सुचविण्यात आली होती.या यादीची चर्चा सुरू असतानाच गुरुवारी पोलीस महासंचालक कार्यालयाने बिनतारी संदेश जारी केला. त्यात या वेबसाइटवर जाहीर करण्यात आलेल्या लिपिकांच्या कार्यालय अधीक्षक पदावरील बढतीच्या यादीशी महासंचालक कार्यालयाचा संबंध नसल्याचे नमूद केले. तसेच महासंचालक कार्यालयाने ही यादी जारी केली नसून ती रद्द समजण्यात यावी, ती चुकीने प्रसिद्ध झाली, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी तांत्रिक कारण पुढे करण्यात आले आहे.ही यादी आता वेबसाईटवरून हटविण्यात आली आहे. यात कुणाचा सहभाग आहे की वेबसाईट हॅक करून त्याच्यासोबत छेडछाड केली याची चौकशी सुरू आहे.अशी आहेत ‘ओएस’ची नावेचुकीने का होईना कार्यालय अधीक्षक (ओएस) पदावरील बढतीच्या यादीत स्थान मिळालेल्यांमध्ये माधवी जाधव, हर्षद म्हात्रे, ज्ञानेश्वर येडशीकर, पांडुरंग सिंगनाथ, संजय गुजर, सुरेंद्र दंडवते, श्रीधर कळमनकर, भीमराव गायकवाड, चरणदास भगत, श्याम पडगीलवार, आत्माराम जाधव, माधुरी घोडे, श्यामराव वडपलवार, रमेश देवडेकर, श्रीकांत खरतडे, रमेश टेकाम, रवींद्र बडकस, साधना लांडगे, देवजी कांबळे यांचा समावेश होता.