शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांपासून जीवितास धोका : मंदा म्हात्रे

By admin | Updated: May 31, 2014 22:38 IST

जे˜ीच्या उद्घाटनाच्या नामफलकावरून पालकमंत्री गणेश नाईक व माजी आमदार मंदा म्हात्रे यांच्यामधील वाद विकोपाला गेले आहेत.

नवी मुंबई : जे˜ीच्या उद्घाटनाच्या नामफलकावरून पालकमंत्री गणेश नाईक व माजी आमदार मंदा म्हात्रे यांच्यामधील वाद विकोपाला गेले आहेत. म्हात्रे यांनी आज पोलिस आयुक्तांची भेट घेऊन नाईकांकडून जीवितास धोका असल्याचे निवेदन दिले आहे. दिवाळे गावात कोळी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या जे˜ीचे उद्घाटन काही महिन्यांपूर्वी माजी आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले होते. सदर नामफलक अधिकार्‍यांनी शुक्रवारी काढून टाकल्यामुळे पालकमंत्री गणेश नाईक व म्हात्रे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. ही घटना योग्य नाही. एकाच पक्षात असूनही आमदार असतानाही कधीही विश्वासात घेतले नाही. शहरातील शौचालयापासून सर्व वास्तूंच्या उद्घाटनाच्या पाट्यांवर पालकमंत्र्यांचे नाव झळकत आहे. परंतु आम्ही कधीही आक्षेप घेतलेला नाही. परंतु एका पाटीसाठी त्यांनी घेतलेला अ˜हास योग्य नसल्याचे मत म्हात्रे यांनी व्यक्त केले होते. राष्ट्रवादी काँगे्रसमधील उफाळून आलेला वाद आज पोलिस स्टेशनपर्यंत पोहचला आहे. मंदा म्हात्रे यांनी पोलिस आयुक्त के. एल. प्रसाद यांची भेट घेतली. पालकमंत्र्यांकडून आपण व आपल्या परिवारास धोका असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँगे्रसमधील हा संघर्ष अजून चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षश्रेष्ठी या वादाची दखल घेणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.