शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍याच्या खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप

By admin | Updated: July 11, 2014 01:06 IST

अकोला जिल्ह्यातील चिंचोली येथील हत्याकांड

अकोला: अकोला जिल्ह्यातील बाश्रीटाकळी तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी येथील खूनप्रकरणी दोन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींनी पूर्ववैमस्यातून गावातील एका शेतकर्‍याचा ६ एप्रिल २00९ रोजी खून केला होता. चिंचोली रूद्रायणी येथील ज्ञानदेव ठाकरे हे शेतात काम करीत असताना त्यांच्याशी लक्ष्मण हरीशचंद्र भटकर आणि देवीदास उर्फ सहदेव सुखदेव वानखडे यांनी पूर्ववैमस्यातून वाद घातला. यावेळी त्यांनी ठाकरे यांच्यावर कुर्‍हाड आणि काठीने हल्ला केला. या हल्ल्यात ठाकरे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ज्ञानदेव ठाकरे यांच्या पत्नी सिंधुताई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बाश्रीटाकळी पोलिस ठाण्यात भादंविचे कलम ३0२ (खून) व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी सिंधुबाई आणि त्यांची मुलगी योगिता हिने आरोपीच्या हातात कुर्‍हाड बघितली होती. तत्कालीन ठाणेदार वसंत सोनोने यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.सी. बावसकर यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षाने १0 साक्षीदार तपासले. दोन्ही बाजूच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे, ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आरोपींना तीन महिने कारावास भोगावा लागणार आहे. सरकारकडून अँड. मंगला पांडे यांनी युक्तिवाद केला. आरोपींची बाजू अँड. मोहन मोयल आणि अँड. संजय अटल यांनी मांडली.