शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदायीचा मलिदा लाटणार्‍यांचे होणार उत्खनन

By admin | Updated: July 6, 2014 00:44 IST

जीवनदायी योजनेतून करण्यात आलेल्या शस्त्रक्रियांचे सर्व दस्तऐवज ताब्यात घेउन त्या रुग्णांची तपासणी व चौकशी करणार आहे.

अकोला- सिटी हॉस्पिटलमध्ये गोरेगाव येथील इसमावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेतील हेराफेरीच्या चौकशीसाठी शनिवारी तीन समित्या गठित करण्यात आल्या आहेत. यामधील एक समिती शस्त्रक्रियेची चौकशी करणार असून, दुसरी समिती फौजदारी कारवाईसाठी चौकशी करून अहवाल सादर करणार आहे तर तिसरी समिती सिटी हॉस्पिटलमध्ये जीवनदायी योजनेतून करण्यात आलेल्या शस्त्रक्रियांचे सर्व दस्तऐवज ताब्यात घेउन त्या रुग्णांची तपासणी व चौकशी करणार आहे. तीनही समित्यांच्या चौकशीमध्ये जीवनदायीचा मलिदा लाटणार्‍यांचे व गरिबांच्या जीवाशी खेळणार्‍यांचे संपूर्ण उत्खनन होणार आहे. गोरेगाव खु. येथील रहिवासी पांडुरंग दगडू वाघ (५२) यांना पाठीचा त्रास असल्याने त्यांच्यावर रामदासपेठेतील सिटी हॉस्पिटलमध्ये डॉ. उमेश गडपाल व डॉ. अतुल महाशब्दे यांनी पाठीच्या मणक्यांची शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेत वाघ यांच्या पाठीमध्ये दोन स्क्रू टाकण्यात आले; मात्र काही वेळेतच स्क्रू पुन्हा काढण्यात आले. यामध्ये सिटी हॉस्पिटल प्रशासनासह डॉक्टरांनी स्क्रूची रक्कम जीवनदायी योजनेतून लाटण्याचा प्रयत्न केला असून, त्यानंतर स्क्रूदेखील परत दुसर्‍या शस्त्रक्रियेसाठी वापरण्याचा त्यांचा बेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. डॉक्टरांनी केलेल्या एका शस्त्रक्रियेमधून डॉक्टरांसह हॉस्पिटल प्रशासन सुमारे दोन लाख रुपयांची रक्कम लाटणार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये अशाच प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्याचा संशय राज्याच्या आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव डॉ. मीना लोचणी यांना आल्याने त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश जीवनदायी आरोग्य योजनेचे मुख्य सचिव, आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालकांना दिले आहेत.