चला पंढरीसी जाऊ..

By Admin | Updated: June 19, 2014 23:30 IST2014-06-19T23:30:57+5:302014-06-19T23:30:57+5:30

विठूभेटीची आस लागलेले लाखो भाविक अलंकापुरीत दाखल झाले आहेत. शुक्रवारी (दि. 2क्) दुपारी 4 वाजता मुख्य प्रस्थान सोहळ्यास आरंभ होईल.

Let's go to Pandharasi .. | चला पंढरीसी जाऊ..

चला पंढरीसी जाऊ..

>आळंदी देवाची :  टाळमृदंगाचा 
गजर, भजन, कीर्तन अन् प्रवचनाने अवघी अलंकापुरी दुमदुमून निघाली आहे.  विठूभेटीची आस लागलेले लाखो भाविक अलंकापुरीत दाखल झाले आहेत. शुक्रवारी (दि. 2क्) दुपारी 4 वाजता मुख्य प्रस्थान सोहळ्यास आरंभ होईल. 
आज पहाटेपासूनचे धार्मिक कार्यक्रमांमध्ये पहाटे 2.45 वाजता घंटानाद, काकडा झाल्यानंतर माऊलींना अभिषेक व पंचामृत पूजा, पहाटे साडेचार ते सकाळी साडेअकरा वाजेर्पयत भाविकांच्या महापूजा व दर्शन खुले राहील. 
दुपारी साडेबारा वाजता श्रींना दिल्या जाणा:या नैवेद्यासाठी दर्शन अर्धा तास बंद राहील. दुपारी दोननंतर भाविकांना दर्शन खुले राहील. दोन ते साडेतीन या वेळेत पालखीपुढे चालणा:या भक्तांच्या 27 ंिदंडय़ांना महाद्वारातून प्रवेश दिला जाईल व त्यांच्या पाठोपाठ अश्वांना प्रवेश दिला जाईल. चार वाजेर्पयत हैबतबाबा व संस्थानर्फे आरती होईल. वीणामंडपात मानक:यांना नारळ प्रसाद देऊन 
सुगंधी फुलांनी सजविलेल्या 
पालखीत माऊलींच्या पादुका ठेवून पालखी मुख्य मंदिरातून बाहेर 
पडले. (वार्ताहर)
 
आज दिवसभर आळंदीला जोडणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले होते. टाळमृदंगाचा गरज करीत, ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा जयघोष करीत दर वर्षी लाखो वारकरी, भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतात. त्यासाठी इंद्रायणी घाट, ज्ञानेश्वरमहाराज मंदिर, महाद्वार, केळगाव, गोपळपुरा, च:होली रस्ता, मरळक रस्ता, देहूफाटा, डुडुळगाव, मठ, मंदिरे, धर्मशाळा यांचा परिसर गर्दीने फुलून गेला आहे.

Web Title: Let's go to Pandharasi ..