शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

कुष्ठरुग्णांचे अपंगत्व ऐरणीवर

By admin | Updated: August 19, 2014 01:58 IST

कुष्ठरुग्णांची संख्या मात्र वेगाने वाढत असल्याचे राष्ट्रीय कुष्ठरोग निमरूलन कार्यक्रमाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

नरेंद्र जावरे - अमरावती
देशात आरोग्य विभागामार्फत पोलिओमुक्तीवर भर दिला जात आहे. पोलिओ निमरूलनाकडे देशाची वाटचाल सुरू असताना दुसरीकडे कुष्ठरुग्णांची संख्या मात्र वेगाने वाढत असल्याचे राष्ट्रीय कुष्ठरोग निमरूलन कार्यक्रमाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक कुष्ठरुग्ण उत्तर प्रदेशात असले तरी कुष्ठरोगामुळे कायमचे अपंगत्व आलेल्या रुग्णांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. ठाणो, नाशिक व चंद्रपुरात सर्वाधिक कुष्ठरोगी असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
राष्ट्रीय कुष्ठरोग निमरूलन कार्यक्रमांतर्गत 2क्13-14 या वर्षात केलेल्या सव्रेक्षणात कुष्ठरुग्णांची आकडेवारी प्राप्त झाली आहे. उत्तर प्रदेशात नवीन कुष्ठरुग्णांची संख्या 22,565 असून त्यापैकी 722 जणांना कायम अपंगत्व आले आहे. कुष्ठरोगामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या रुग्णांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. तिस:या क्रमांकावर असलेल्या छत्तीसगड राज्यात 8,519  रुग्णांपैकी 6,क्2क् रुग्णांना कायमचे अपंगत्व आले आहे. तर महाराष्ट्रातील 16,4क्क् नवीन रुग्णांपैकी 813 कुष्ठरुग्णांना कायमचे अपंगत्व आले आहे. 
देशात गतवर्षी 1,34,752 तर या वर्षी 1,26,913 रुग्ण आढळले आहेत. गतवर्षी 671 रुग्णांना कायम अपंगत्व आले होते. या वर्षी 813 अर्थात 142 रुग्णांना कायम अपंगत्व आले आहे.
 
राज्यात ठाणो, चंद्रपूर नाशिकमध्ये सर्वाधिक रुग्ण
राज्यात सद्य:स्थितीत ठाणो जिल्ह्यात 2,716 रुग्ण असून, चंद्रपूर 1,293, नाशिक 1,252, जळगाव 966, 
नागपूर 745, पुणो 767, रायगड 759, भंडारा 5क्5, नंदुरबार 498, धुळे 485, यवतमाळ 457, अमरावती 415, 
वर्धा 3क्3 रुग्ण असून राज्यात 
सर्वात कमी दोन आकडे 
असलेली रुग्ण संख्या सिंधुदुर्ग
येथील 85 आहे.
 
समाजात जनजागृती करायला हवी
आपला देश पोलिओमुक्त झाला आहे. परंतु, कुष्ठरोगी अपंगांची संख्या वाढत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. समाजात जनजागृती करुन रुग्णांना त्वरित उपचारासाठी
आणून कुष्ठरोग थांबवणो गरजेचे असल्याचे मत कोठारा कम्युनिटी हॉस्पिटलच्या दी लेप्रसी मिशनचे कार्यक्रम अधिकारी सुरेश धोंडगे यांनी व्यक्त केले.