शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

Leopard: बिबट्यांच्या दहशतीवर उपाय; ‘नसबंदी’ करणार, गावात सायरन वाजणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:53 IST

Leopard New: पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही महिन्यांत बिबट्यांच्या हल्ल्यामुळे  नागरिकांमध्ये भीतीचे  वातावरण निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क    पुणे: पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही महिन्यांत बिबट्यांच्या हल्ल्यामुळे  नागरिकांमध्ये भीतीचे  वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे  बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी बिबट्यांच्या नसबंदीला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाची मान्यता मिळाली आहे, असे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सोमवारी सांगितले.

बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष 

ठेवण्यासाठी चंद्रपूरच्या धर्तीवर पुणे, नाशिक, अहिल्यानगर येथे एआय यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.   तसेच, अत्याधुनिक सॅटेलाइट कॅमेरे बसवले जाणार आहेत. बिबट्या जवळ आल्यास गावांमध्ये सायरनद्वारे तातडीचा अलर्ट देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. वनमंत्री नाईक यांनी पुणे, नाशिक व अहिल्यानगर येथील वनविभागांतील  अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.  त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.  

सहा महिने अभ्यास करणार

बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी नसबंदीचा प्रयोग आवश्यक आहे. सहा महिन्यांत हा प्रयोग किती यशस्वी ठरतो, याचा अभ्यास करून पुढील धोरण ठरविण्यात येईल. जेथे बिबट्या नियंत्रणातच येत नसेल, तेथे त्याला गोळ्या घालण्याचे आदेश आहेत, असेही नाईक यांनी सांगितले. खाततगाव येथे विहिरीत पडलेला बिबट्याने पाइपाचा आधार घेतला होता.

पिंजरे वाढविणार 

बिबटे पकडण्यासाठी उपलब्ध असलेले २०० पिंजरे अपुरे असून पिंजऱ्यांची संख्या एक हजार करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात यासाठी ११ कोटींची तरतूद केली आहे. पुणे, जुन्नर विभागात ताडोबाप्रमाणे बांबूची भिंत उभारण्यात येणार आहे. ‘वनतारा’ प्रकल्पात येत्या १० ते १२ दिवसांत काही बिबट्यांना स्थलांतरित केले जाईल, असेही नाईक म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sterilization, sirens to curb leopard terror in Pune, Nashik!

Web Summary : To control rising leopard attacks, sterilization gets approval. AI systems and satellite cameras will track movements, with sirens alerting villagers. The number of cages will increase to one thousand. A six-month study will assess sterilization effectiveness.
टॅग्स :leopardबिबट्याAhilyanagarअहिल्यानगरPuneपुणेkolhapurकोल्हापूर