शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

डावखरे-प्रधान भिडले

By admin | Updated: July 6, 2014 00:40 IST

मेळावा संपताच विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे आणि शहराध्यक्ष मनोज प्रधान यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली.

ठाणो : ठाण्यात शनिवारी राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे कार्यकत्र्याना आपापसांतील वाद मिटवून एकदिलाने काम करा, असे सांगत असताना दुसरीकडे हा मेळावा संपताच विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे आणि शहराध्यक्ष मनोज प्रधान यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. या मेळाव्यात भाषण करणा:या वक्त्यांच्या यादीतून ऐनवेळी डावखरे यांचे नाव वगळले गेल्याने ते नाराज झाले होते. परंतु, यानिमित्ताने ठाण्यातील राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे.  
डावखरे भाषण करणार नाहीत हे लक्षात येताच प्रथम प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाईक, डावखरे, आव्हाड असे ठाणो जिल्ह्यातील गटांचे जे राजकारण चालू आहे, ते बाजूला सारून पक्ष हितासाठी एकत्र येऊन काम करण्याबाबत या सर्वाना कानपिचक्या दिल्या. त्यानंतर, खुद्द अजित पवार यांनीदेखील यापुढे कोणी भाषण करावे, याची यादी स्वत: प्रदेशाध्यक्षांनी तयार करावी, अशी सूचना केली. पण, त्यांचे हे बोलणो मनावर घेतील ते ठाण्यातील राष्ट्रवादीतील नेते कसले. हा मेळावा संपताच अजित पवार पत्रकार परिषदेला जात असताना सभागृहाच्या बाहेरच वसंत डावखरे आणि मनोज प्रधान यांच्यात बाचाबाची झाली.  डावखरेंनी प्रधान यांना खडेबोल सुनावले. 
हे प्रकरण इतक्यावरच न थांबता त्यानंतर प्रधान यांच्या पत्नीनेही डावखरे पितापुत्रकडे झाल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. या वेळी त्यांचे डोळेही पाणावले होते. त्यानंतर, झाल्या प्रकाराबद्दल बोलताना मनोज प्रधान म्हणाले की, हा सर्व प्रकार नजरचुकीने झाला असून, भाषण करणा:या वक्त्यांच्या यादीत डावखरे यांचे नाव होते; पण टायपिंग करताना नजरचुकीने ते नाव वगळले गेले. डावखरे हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांना आम्हाला रागवण्याचा अधिकार असून आम्ही सर्व एकदिलाने यापुढे काम करू, असे स्पष्टीकरण प्रधान यांनी दिले. 
 
या मेळाव्याला जे वक्ते भाषण करणार होते, त्यांची एक यादी तयार करण्यात आली होती. या यादीत विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचे नावच नव्हते. त्यामुळे ते नाराज झाले आणि त्यांनी आपण भाषणच करणार नसल्याची भूमिका घेतली.