शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांवर टीका करणे ठरणार देशद्रोह ?

By admin | Updated: September 4, 2015 14:50 IST

मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर व सत्तेतील पदाधिकारी यांच्यावर द्वेष, तुच्छता आणि सामाजिक असंतोष निर्माण करणारी विधान करणे हा देशद्रोहाचा गुन्हा ठरणार आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ४ - मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर व सत्तेतील पदाधिकारी यांच्यावर द्वेष, तुच्छता आणि सामाजिक असंतोष निर्माण करणारी विधान करणे हा देशद्रोहाचा गुन्हा ठरणार आहे. मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानंतर राज्याच्या गृहविभागाने परिपत्रक काढून या संदर्भातील माहिती दिली आहे. मात्र हे परिपत्रक वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. 
व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी यांच्या व्यंगचित्राविरोधात तीन वर्षांपूर्वी खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. असीम यांच्या व्यंगचित्रांमधून तिरस्कार, तुच्छता तसेच राष्ट्रीय प्रतिकांची मानहानी होत असल्याचा आरोप होता व यानंतर असीम यांच्यावर भारतीय दंड विधानातील कलम १२४ अ अंतर्गत राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. टीकेची झोड उठल्यानंतर राज्य सरकारने असीम त्रिवेदी यांच्यावरील राष्ट्रदोहाचा गुन्हा मागे घेतला होता. याप्रकरणी दाखल झालेल्या एका याचिकेवर निकाल देताना मार्च २०१५ मध्ये हायकोर्टाने राज्य सरकारला दिशा निर्देश दिले होते. यात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करताना काय दक्षता घ्यावी याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. 
हायकोर्टाच्या आदेशानुसार राज्याच्या गृहविभागाने परिपत्रक काढले आहे. यामध्ये कायदेशीर मार्गाने स्थापन झालेल्या सरकारविरोधात बंडाची भावना निर्माण होऊन सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये म्हणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येईल असे म्हटले आहे. 
तोंडी, लेखी, खुणा, दृश्य किंवा अन्य मार्गांनी केंद्र किंवा राज्य सरकारमधील लोकप्रतिनिधींविरोधात 
तोंडी किंवा लेखी शब्दांद्वारे अथवा खुणांद्वारे, अगर दृश्य अथवा अन्य मार्गामार्फत केंद्र अथवा राज्य सरकार, लोकसेवक व सरकारचे प्रतिनिधी यांच्याबद्दल द्वेष, तुच्छता, असंतोष, शत्रुत्वाची भावना निर्माण करणारे कृत्य केल्यास देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येईल असे यामध्ये म्हटले आहे. मात्र या परिपत्रकावरुन आता वाद निर्माण झाला असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचे उल्लंघन होत असल्याचा दावाही केला जात आहे.