शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

विलासराव देशमुखांबाबत केलेल्या वक्तव्यावर ठाम आहात का? रवींद्र चव्हाणांनी दिलं असं उत्तर, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:07 IST

Ravindra Chavan News: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. रवींद्र चव्हाण यांनी लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील अशा प्रकारच्या केलेल्या विधानावरिोधात काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. रवींद्र चव्हाण यांनी लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील अशा प्रकारच्या केलेल्या विधानावरिोधात काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, वाद वाढू लागल्यानंतर आता रवींद्र चव्हाण यांनी स्पष्टीकरण देत विलासराव देशमुख यांच्या चिरंजीवांची दिलगिरी व्यक्त केली आहे.

रवींद्र चव्हाण हे आज छत्रपती संभाजीनगर येथे आले असताना लातूरमध्ये विलासराव देशमुख यांच्याबाबत तुम्ही जे वक्तव्य केलं, त्यावर अजूनही ठाम आहात का? असं विचारलं असता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, मी विलासराव देशमुख यांच्यावर कोणत्याही पद्धतीची टीकाटिप्पणी केली नाही. विलासराव हे मोठे नेते होते. मुख्यमंत्री म्हणून काम केलंय. मात्र त्या ठिकाणी असणाऱ्या काँग्रेस पक्षाचा अजेंडा हा पूर्णच्या पूर्ण विलासरावांच्या भोवती केंद्रित झालेला दिसत आहे. काँग्रेस पक्ष हा आताही विलासरावांकडे पाहून आपण मतदान करावं, विलासरावांना घेऊन मतदान करावं. विलासराव यांनाच फोकस करून काँग्रेस तिथे मतदान मागत आहे, असा दावा चव्हाण यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, आता त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेलं काम, महायुतीच्या माध्यमातून झालेलं काम, या सर्व गोष्टी विकासात्मक दृष्टीकोनातून या ठिकाणी झालेल्या आहेत. त्याचा संदर्भ घेऊन मी तसं म्हटलं. तरीसुद्धा त्यांचे चिरंजीव, जे माझे चांगले मित्र आहेत, त्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी त्यांच्या चिरंजींवांची दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगून चव्हाण यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

यावेळी रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की,  प्रत्येक महानगरपालिकेची निवडणूक ही कशासाठी असते तर ती त्या ठिकाणी असणाऱ्या नागरी सुविधा ह्या कोणता पक्ष गतिमान पद्धतीने करून देईल, याची निवड करण्यासाठी असते. त्यामुळे लातुरमध्ये सुद्धा गतिमान पद्धतीने सर्व नागरी सुविधा व्हायला हव्यात, हे अत्यंत महत्त्वाचं आहे.  या मताचा मी आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Chavan clarifies remarks on Deshmukh, expresses regret to son.

Web Summary : Ravindra Chavan's statement about Vilasrao Deshmukh sparked controversy. Chavan clarified he didn't criticize Deshmukh, but focused on Congress's reliance on his legacy. He apologized to Deshmukh's son if his remarks were hurtful, emphasizing development under Modi's leadership and local civic improvements.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Latur Municipal Corporation Electionलातूर महानगरपालिका निवडणूक २०२६Ravindra Chavanरविंद्र चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेस