शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांस शौचालय साफ करण्याची शिक्षा

By admin | Updated: October 12, 2016 18:44 IST

शाळेत येण्यास उशीर झाल्याच्या कारणावरुन मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांकडून शाळेतील शौचालयाची स्वच्छता करुन घेतल्याचा खळबळदायक प्रकार शहरातील

ऑनलाइन लोकमतलोणार (बुलडाणा), दि. 12 - शाळेत येण्यास उशीर झाल्याच्या कारणावरुन मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांकडून शाळेतील शौचालयाची स्वच्छता करुन घेतल्याचा खळबळदायक प्रकार शहरातील नगर पालिकेच्या काटे नगरातील उर्दू पुर्व माध्यमिक शाळेत १२ आॅक्टोबर रोजी घडला. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी मुख्याध्यापकाची तक्रार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.स्थानिक नगर पालिकेच्या उर्दु पूर्व माध्यमिक शाळेच्या इयत्ता ७ वी शिक्षण घेणाारा शे.रेहान शे.उस्मान या विद्यार्थ्यास काही कारणास्तव शाळेत येण्यास उशीर झाला. शाळेत पोहोचला त्यावेळी राष्ट्रगित सुरु असल्याने शे.रिहान हा फाटकाबाहेर थांबला. राष्ट्रगित संपल्यानंतर शे.रेहान याने शाळेत प्रवेश करताच शाळेचे मुख्याध्यापक मुजाहिद यांनी शे.रेहानलाथांबण्यास सांगून शाळेत उशीरा येण्याचे कारण विचारले. उशीरा आल्याबद्दल रेहानकडून शाळेतील शौचालय व्यक्तीश उभे राहून स्वच्छ करुन घेतले. सदर प्रकार विद्यार्थ्यांने आपल्या पालकाजवळ कथन केल्यानंतर रेहानचे वडील शे.उस्मान यांनी प्रकाराबाबत मुख्याध्यापक मुजाहीदसर यांना विचारणा केली असता विद्यार्थ्यांनी शाळेत उशीरा येऊ नये याकरीता न भुतो न भविष्यती अशी अद्दल घडविण्यासाठी शिक्षा केल्याचे सांगितले. संडास साफ करुन घेतल्याने रेहान याची प्रकृती ढासळली असून त्याला ताप सुध्दा आला आहे.  यामुळे सदर प्रकाराची सखोल चौकशी करुन दोषी मुख्याध्यापकास सेवेतून निलंबीत करण्याचीमागणी शे.रेहान यांचे वडील शे.उस्मान शे.दाऊद यांनी निवेदनाद्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, शिक्षणमंत्री विनोद तावडे जिल्हाधिकारी बुलडाणा, खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ.संजय रायमुलकर, मुख्याधिकारी न.पा.लोणार, तहसिलदार लोणार, प्रधान सचिव शालेय शिक्षण मुंबई यांच्याकडे केली आहे.न.पा.उर्दु पुर्व माध्यमिक शाळा लग्न समारंभासाठी भाडेतत्वावर देण्यात येते. यावेळी शाळेतील शौचालयाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. सदर शौचालय स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची असतांना मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांकडून संडास स्वच्छ करुन घेणे कितपत योग्य आहे.- शे.उस्मान शे.दाऊदपालक, लोणारझालेल्या गंभीर प्रकाराबाबत चौकशीचे आदेश दिले असून विद्यार्थ्यांकडून शौचालय स्वच्छ करुन घेतल्याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकास कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.- विजय लोहकरेमुख्याधिकारी न.पा.लोणार