शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

कोरोनामुळे अनेकांच्या 'अंतिम' इच्छेला मूठमाती; अवयवदानाचा/देहदानाचा टक्का घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 1:37 PM

एखादा मुख्य अवयव खराब झाल्याने दरवर्षी किमान पाच लाख लोकांचा मृत्यू अवयव उपलब्ध न झाल्याने होतो. यांपैकी दोन लाख जणांचा मृत्यू  लिव्हरचा आजार आणि पन्नास हजार जणांचा मृत्यू हृदयाशी संबंधित आजाराने होतो. या शिवाय...

ठळक मुद्देकोरोनामुळे देहदानाचा टक्का घसरला.दरवर्षी किमान पाच लाख लोकांचा मृत्यू अवयव उपलब्ध न झाल्याने होतो.दोन लाख जणांचा मृत्यू  लिव्हरचा आजार आणि पन्नास हजार जणांचा मृत्यू हृदयाशी संबंधित आजाराने होतो.

मुंबई/नवी दिल्ली - सध्या कोरोना व्हायरस महामारीमुळे देहदान अथवा अवयवदानात मोठ्या अडचणी येत आहेत. यामुळे अनेकांची देहदान किंवा अवयवदान करण्याची अखेरची इच्छाही अपूर्णच राहत आहे. देहदानालाच महादान, असेही संबोधले जाते. देह सोडताना, आपल्या पश्चात, आपला देह कुणाच्या तरी कामी यावा, याहून अधिक चांगली गोष्ट ती काय असू शकते? देहदानाच्या माध्यमाने आपण एखाद्याला नवे जीवन देऊ शकतो. एखाद्याच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसू शकतो. आपण पुन्हा एकदा एखाद्या व्यक्तीला हे जग दाखवू शकतो, त्यामुळे अनेकांची देहदान करण्याची इच्छा असते. अशा प्रकारची उदारता, ही मनाच्या महानतेचे द्योतक आहे.

कोरोनामुळे देहदानाचा टक्का घसरला -संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. यामुळे, वैद्याकीय क्षेत्रावरील दबावही वाढला आहे. परिणामी, सरकारी आणि खासगी रुग्णालयांतही कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारांवरच अधिक भर दिला जात आहे. कारोनाच्या पार्श्वभूमीवर अवयव प्रत्यारोपणाचा आकडा कमी झाला आहे. अनेक ठिकाणी शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच देहदान अथवा अवयव दानाच्या प्रक्रियेतही अडथळा आला आहे. देहदानात किडनी, फुफ्फुस, हृदय, यकृत, स्वादुपिंड, डोळे, कॉर्निआ, त्वचेच्या उती, हाडांच्या उती, हृदयाचा झडपा आदींचा समावेश होतो.

...आणि जैन यांची देहदानाची इच्छा अपूर्णच राहिली -कोरोना व्हायरसचा देहदानावर मोठा परिणाम झाला आहे. साधारणपणे गेल्या चार महिन्यांपूर्वी मध्यप्रदेशातील सागर येथील एक समाजसेवक, लायन्स क्लबचे वरिष्ठ सदस्य प्रकाश जैन यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले. जैन स्वतःच इतरांना देहदानासाठी, अवयवदानासाठी प्रेरित करत होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर, संकल्प पत्र असतानाही कोरोनामुळे त्यांचे देहदान होऊ शकले नाही. यासंदर्भात शहरातील काही समाजसेवकांनी महापालिकेशी चर्चाही केली मात्र, कोरोनाचा प्रोटोकॉल अडवाला. पत्नीच्या निधनानंतर जैन एकटेच राहत होते. त्यांनी आयुष्यभर हजारो लोकांची मदत केली. मात्र, त्यांची देहदानाची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली.

अवयवदानात सुमारे 70% घट -मुंबईत सुमारे 4000 रुग्ण मूत्रपिंड, यकृत, हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड या गंभीर आजारांमुळे ग्रस्त आहेत. ते अवयवदानाच्या प्रतीक्षेत आहेत. अवयव प्रत्यारोपण हा त्या रुग्णांचे प्राण वाचवण्याचा एकमेव मार्ग आहे. मात्र, कोरोनामुळे यात मोठा अडथळा आला आहे. झेडटीसीसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, अवयवदानात सुमारे 70% घट झाली आहे. मार्च 2019 ते जुलै 2019 या काळात एकूण 33 दात्यांनी अवयव दान केले होते. यात, 59 किडनी, 28 यकृत, 12 हृदय आणि 6 फुप्फुसांचा समावेश होता. मात्र, 2020च्या मार्च ते जुलै या काळात केवळ 10 दात्यांनीच अवयव दान केले. यात 14 किडनी, 10 यकृत, 1 हृदय, 1 फुप्फुस, 1 स्वादुपिंड आणि एका छोट्या आतड्याचा समावेश आहे.

नागपुरातही घटला देहदानाचा टक्का -महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरचा विचार केला, तर येथे पाच महिन्यात (मार्च ते ऑगस्ट) कुठल्याही प्रकारचे प्रत्यारोपण करण्यात आले नाही. याशिवाय कोरोनामुळे येथे मरणोत्तर देहदानही अवघड झाले आहे. या काळात येथे केवळ तीन देहच दानाच्या स्वरुपात मिळाले. मात्र जानेरावी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात 10 देहदान झाले. 2017मध्ये येथे, 32 जणांनी देहदान केले होते. 2018मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (मेडिकल)मध्ये 27 मृतदेह दान करण्यात आले. मेयोमध्ये 5 देहदान झाले. तर 2019मध्ये, 36 मेडिकल कॉलेजमध्ये, तर 9 देहदान मेयोमध्ये झाले होते. 2020मध्ये मात्र, हा टक्का घसरला आहे.

भारतात दरवर्षी साधारणपणे 5 लाख लोक अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असतात. ते मृत्यूशी झुंजत असतात. मात्र, प्रत्यारोपणाची संख्या आणि अवयव उपलब्ध होण्याच्या संख्येत मोठी तफावत आहे. अवयवदान ही एक अशी प्रक्रिया आहे. ज्यात अवयव दाता अवयवाची आवश्यकता असलेल्या व्यक्तीला अवयव देत असतो. यात दाता जिवंत अथवा मृतही असू शकतो. त्यामुळे कोरोनाला न घाबरता अवयव दानासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. 

दरवर्षी किमान पाच लाख लोकांचा मृत्यू अवयव उपलब्ध न झाल्याने होतो -एका न्यूज वेबसाईटने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात भारतातील एका सर्वेक्षणाचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, एखादा मुख्य अवयव खराब झाल्याने दरवर्षी किमान पाच लाख लोकांचा मृत्यू अवयव उपलब्ध न झाल्याने होतो. यांपैकी दोन लाख जणांचा मृत्यू  लिव्हरचा आजार आणि पन्नास हजार जणांचा मृत्यू हृदयाशी संबंधित आजाराने होतो. या शिवाय, जवळपास एक लाख पंन्नास हजार लोक किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असतात. त्यांपैकी केवळ पाच हजार लोकांनाच किडनी प्रत्यारोपणाचा लाभ होतो. 

10 लाख लोकांमागे केवळ 0.08 डोनरच अवयवदान करतात -यावरून भारतात अवयवदान अथवा देहदानाची किती आवश्यकता आहे, याचा अंदाज येऊ शकतो. मात्र, असे असतानाही भारतात दहा लाख लोकांमागे केवळ 0.08 डोनर अवयवदान करतात. तर अमेरिका, इंग्लंड, जर्मनीमध्ये भारताच्या तुलनेत 10 लाखांमागे 30 डोनर आणि सिंगापूर, स्पेनमध्ये 10 लाखमागे 40 डोनर अवयवदान करतात. म्हणूनच कित्येकदा अतिमहत्वाच्या व्यक्ती प्रत्यारोपन आणि उपचारांसाठी या देशांमध्ये जाताना आढळतात. भारत फार मागे आहे. यामुळे अवयवदान तथा देहदानासाठी भारतात जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी चळवळ जन्माला आली आहे, पण ती म्हणावी तशी रुजलेली नाही. 

तामिळनाडूत दहा लाखांमागे 136 लोक करतात अवयवदान -गेल्या वर्षीच्या आकडेवारीचा विचार करता, भारतातील तामिळनाडू राज्य देहदानाच्या बाबतीत अत्यंत जागृत असल्याचे दिसते. येथे प्रती दहा लाख लोकांमागे अवयवदान करणारांची संख्या 136 एवढी आहे. अवयव दान कणारा व्यक्ती हा इश्वराचीच भूमिका पार पाडत असतो. एखादी व्यक्ती आपले चांगले अवयव दान करून 8 हून अधिक लोकांचा जीव वाचवू शकते. 

13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस -एखाद्या व्यक्तीला अवयवदानाचे महत्व पटवून देण्याबरोबरच, त्या व्यक्तीला अवयवदानासाठी प्रेरित करण्याच्या हेतूने 13 ऑगस्ट हा जागतिक अवयवदान दिवस म्हणून पाळला जातो.

काही महत्वाच्या नोंदी -1869 - पहिले त्वचा प्रत्यारोपण करण्यात आले.1954 - पहिले यशस्वी किडनी प्रत्यारोपण. यात एका जिवंत दात्याने त्याच्या जुळ्या मुलांना किडनी दिले होती.1962/1963 - मृत व्यक्तीकडून मिळालेल्या किडनी, फुफ्फुस आणि लिव्हरचे पहिले प्रत्यारोपण.1967 - अमेरिकेने सर्वप्रथम हृदय प्रत्यारोपण केले. 

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या आईचे देहदान -केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या आईचे नुकतेच निधन झाले. त्यांनी त्यांच्या आईचे डोळे एम्समध्ये दान केले. याशिवाय, आपण आपल्या आईचा मृतदेह मौलाना आझाद मेडिकल कॉलेज प्रशासनाला देणार आहोत. त्यांचे देहदान आम्हा सर्वांना समाजासाठी जगण्याची प्रेरणा देत राहील, असे ट्विटही त्यांनी केले होते. परंतू राज्ये आणि महत्वांच्या शहरांमध्ये कोरोनाच्या कारणास्तव देहदान आणि अयवदानाची प्रक्रिया एकतर मंदावलेली आहे किंवा पूर्णपणे थांबलेली आहे. या परिस्थितीत पुढचे काही महिने सुधारणा होण्याची चिन्हे नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या -

"झोपेत घोरत असाल तर सावधान! कोरोनामुळे मृत्यूचा तिप्पट धोका"

PAK-चीनच्या संपत्तीतून 1 लाख कोटी कमावण्याच्या तयारीत मोदी सरकार, लवकरच आणणार कायदा!

अमेरिकेला फक्त 4 आठवड्यांत मिळणार कोरोना लस, ट्रम्प यांचा मोठा दावा...!

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOrgan donationअवयव दानMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारतhospitalहॉस्पिटल