राज्यातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी सज्ज 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 07:45 PM2019-09-23T19:45:59+5:302019-09-23T19:46:12+5:30

ईव्हीएम बाबत अफवा पसरविणाऱ्यावर कायदेशीर कारवाईचे संकेत 

The largest assembly constituency in the state is ready for elections | राज्यातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी सज्ज 

राज्यातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी सज्ज 

googlenewsNext

- वैभव गायकर
पनवेल : आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी सोमवारी पनवेलमधील काळसेकर महाविद्यालयात बैठकीचे आयोजन दि .२३ करण्यात आले होते. यावेळी विधानसभा शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने विविध सूचना करण्यात आल्या. पनवेल विधानसभा मतदार संघ हा राज्यातील सर्वात मोठा विधानसभा मतदार संघ आहे.


    या बैठकीला पोलीस, महसूल अधिकारी, पालिका अधिकारी, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते . दि. २१ ऑक्टॉबरला विधानसभेचे मतदान पार पडणार आहे . तर दि. २४ ऑक्टॉबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे . यादृष्टीने मतदान केंद्रावर कोणती खबरदारी घ्यावी ही सूचना निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी केल्या. तसेच प्रचाराच्या अनुषंगाने घ्यावयाच्या परवानग्या याबाबत पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या. मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन मधील बिघाडाची माहिती मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकाऱ्याला द्यावी. ईव्हीएम बाबत विनाकारण अफवा पसरविणाऱ्या घटकांवर कायदेशीर कारवाईचा ईशारा नवले यांनी दिला. यावेळी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी परवानग्यांचा ससेमिरा थांबविण्यासाठी एकाच ठिकाणी सर्व  परवानग्या मिळाव्यात याकरिता एक खिडकी योजना राबविण्याची विनंती करण्यात आली. 


पनवेल विधानसभा मतदार संघ राज्यातील सर्वात मोठा विधानसभा मतदार संघ आहे. यावेळी पोलिसांनी देखील काही मुद्दे उपस्थित केले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी कळंबोलीत मतदान केंद्रांवर बीएल वर पक्षपाती पणाचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला होता. यावेळी मतदान केंद्रावर वाद निर्माण झाला होता. असे वाद निर्माण होणार नाहीत याकरिता बीएलओना सूचना देण्याची विनंती करण्यात आली. कळंबोलीचे पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी बीएलओना आवश्यक सूचना देण्यात येतील असे स्पष्ट केले . 

पनवेल मतदार संघ माहिती 
मतदार संख्या -५ लाख ५४ हजार ४६४
पुरुष मतदार - २ लाख ९७ हजार २७२
स्त्री मतदार -२ लाख ९७ हजार २७२
एकूण मतदान केंद्र -५६७
तळमजल्यावरील केंद्र -५२०
पहिल्या मजल्यावरील केंद्र -५४
दुसऱ्या मजल्यावरील केंद्र -२
सर्वात जास्त मतदार असलेले केंद्र -१५७ खारघर (१७५२ मतदार )रेडक्लिफ शाळा 
सर्वात कमी असलेले मतदार केंद्र -खैरवाडी १६३(३०५) मतदार

Web Title: The largest assembly constituency in the state is ready for elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.