शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘भूमी संपादन विधेयक शेतकऱ्यांना संपवणारे’

By admin | Updated: January 20, 2015 01:47 IST

केंद्र सरकारने नवीन तरतुदींसह सादर केलेले भूमी संपादन विधेयक हे शेतकऱ्यांचे अस्तित्व संपवणारे आहे. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होऊ नये यासाठी सर्व शक्तीनिशी विरोध करू,

पुणे : केंद्र सरकारने नवीन तरतुदींसह सादर केलेले भूमी संपादन विधेयक हे शेतकऱ्यांचे अस्तित्व संपवणारे आहे. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होऊ नये यासाठी सर्व शक्तीनिशी विरोध करू, अशी ग्वाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी सोमवारी पुण्यात दिली.महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्यावतीने (युक्रांद) कोथरूड येथील गांधी भवनात आयोजित ‘भूमी संपादन विधेयक : शेतकऱ्यांसाठी आपत्ती’ या विषयावर नागरी सभा आयोजित करण्यात आली होती. स्मारक निधी आणि युक्रांदचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी वक्ते म्हणून उपस्थित होते.भारतात येऊ घातलेली १८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक थांबली होती. ती यावी म्हणून हे विधेयक आणल्याचे सरकार सांगत आहे. मात्र, जगातील २४ टक्के शेतकरी भारतात आहेत. भारतातील हा शेतकरीवर्ग १२ कोटी मजुरांना रोजगार देतो. भारतात येऊ पाहणारी गुंतवणूक किती लोकांना रोजगार देणार आहे, असा प्रश्न मुळीक यांनी उपस्थित केला.चौधरी म्हणाले, १९९१मध्ये भारताने खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतर जमीन अधिग्रहणात मोठी वाढ झाली. मात्र, अन्नसुरक्षा धोक्यात येऊ नये म्हणून शेतीयोग्य जमीन उद्योगांसाठी वापरता येत नव्हती. मोदी सरकारने ही अटदेखील काढून टाकली आहे. एखाद्या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित करण्यासाठी ७० टक्के संबंधित जमीनमालकांची मंजुरी अनिवार्य असल्याच्या नियमालाही नव्या विधेयकात मूठमाती देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)आधीच्या आघाडी सरकारने तयार केलेल्या या विधेयकात लष्कराचा अपवाद वगळता इतर कोणाला कोणत्याही कारणासाठी शेतजमीन ताब्यात घेता येणार नव्हती. मात्र, मोदी सरकारने यात बदल करून इतर क्षेत्रांनाही शेतजमीन देण्याची तरतूद केली आहे. आम्ही याला ठाम विरोध करू . आम्ही या सरकारसोबत आहोत. एखाद्या मुद्यावर सहमती नाही म्हणून सरकार वाईट, अशी अपरिपक्व भूमिका आमची नाही. मात्र, हे सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठणार असेल, तर आम्ही तसे होऊ देणार नाही. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर केल्यास देशभरात जेथे जेथे भूमी अधिग्रहणाविरोधात आंदोलने होत आहे, तेथे जाऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांना सक्रिय पाठिंबा देईल, असे खा. राजू शेट्टी म्हणाले.