ललित मोदी भेटीने मारिया अडचणीत

By Admin | Updated: June 21, 2015 01:22 IST2015-06-21T01:22:58+5:302015-06-21T01:22:58+5:30

वादग्रस्त ललित मोदी यांच्यावरून राजकारण ढवळत असताना मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया हेही लंडन येथे जुलै २०१४ मध्ये ललित मोदीना भेटल्याची बाब उजेडात

Lalit Modi visits Maria Turning | ललित मोदी भेटीने मारिया अडचणीत

ललित मोदी भेटीने मारिया अडचणीत

मुंबई : वादग्रस्त ललित मोदी यांच्यावरून राजकारण ढवळत असताना मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया हेही लंडन येथे जुलै २०१४ मध्ये ललित मोदीना भेटल्याची बाब उजेडात आल्याने अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) भुवय्या उंचावल्या आहेत. ईडी ललित मोदी यांच्याविरुद्ध १६ गुन्ह्यांप्रकरणी चौकशी करीत असताना मारिया-ललित भेटीचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.
ललित मोदी यांच्याविरुद्ध चौकशी चालू असताना त्यांची पोलिस आयुक्त भेट कशी घेऊ शकतात? वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या दृष्टीने हे निश्चित चांगले वर्तन नाही, असे ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. या प्रकरणावर खुलासा करताना राकेश मारिया यांनी सांगितले की, एका कॉन्फरन्ससाठी लंडनला गेलो असता मोदींचे वकील मला भेटले. लंडनमध्ये मोदी आणि त्यांच्या कुटुंबियाच्या जीवास धोका आहे, त्याअनुषंगाने ललित मोदी यांना तुम्हांला भेटायचे आहे, असे मोदींच्या वकिलाने सांगितले. तेव्हा मी मोदी यांची भेटली घेतली; परंतु, अत्यंत थोड्या वेळासाठी असे मारिया यांनी सांगितले. लंडन हे काही मुंबई पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येत नाही. भारतात येऊन तक्रार दाखल करा, असे मी त्यांना सांगितले. मुंबई पोलिसांना या प्रकरणी चौकशी करता यावी म्हणून मोदींनी मुंबईला परतणे जरुरी आहे, असे मी मोदी आणि त्यांच्या वकिलांना सांगितले. आमची ही भेट अवघ्या १५ ते २० मिनिटाची होती, असे मारिया यांनी जारी केलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
लंडनहून मुंबईला परतल्यानंतर मी याबाबत तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनाही माहिती दिली असल्याचे मारिया यांनी सांगितले. गुन्हे विभागाचा सह-आयुक्त असताना आम्ही ललित मोदींवर हल्ला करण्याचा मुंबई अंडरवर्ल्डचा डाव उधळून लावला होता.

Web Title: Lalit Modi visits Maria Turning