शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमध्ये शेतातील एक लाखाचा कांदा चोरीला!

By admin | Updated: August 22, 2015 00:57 IST

देशभरात कांद्याचे दर शंभरी गाठण्याच्या स्थितीत असताना पाथरे खुर्द येथील शेतकरी भागवत निमसे यांच्या शेतामधील कांदा चाळीतून सुमारे एक लाखाचा

राहुरी (अहमदनगर) : देशभरात कांद्याचे दर शंभरी गाठण्याच्या स्थितीत असताना पाथरे खुर्द येथील शेतकरी भागवत निमसे यांच्या शेतामधील कांदा चाळीतून सुमारे एक लाखाचा दोन हजार पाचशे क्विंटल कांदा बुधवारी रात्री चोरीला गेल्याची घटना उघड झाली आहे.घाऊक बाजारात कांद्याचे सरासरी दर चार हजारांच्या पुढे गेलेले असल्याने किमान यंदा तरी चांगले पैसे होतील, अशी आशा होती. चोरट्यांनी शेतातील गहू व ट्रॅक्टरची अवजारेही चोरून नेली. चार पैसे मिळतील म्हणून साठवणूक केलेला कांदा चोरीला गेला, अशा शब्दांत निमसे यांनी ‘लोकमत’कडे भावना व्यक्त केल्या़ चोरीची घटना सांगताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. कर्ज काढून बांधलेल्या चाळीमधील कांदा चोरीला गेल्याने त्याचे कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. काही दिवसांपूर्वीच काळे आखाडा येथून बाळासाहेब रासने यांचा पाच हजार क्विंटल कांदा चोरीस गेला होता़ त्याबाबत त्यांनी पोलिसात फिर्याद नोंदविली आहे. मात्र, त्या चोरीचा अजून तपास लागलेला नसताना पुन्हा कांदा चोरीची घटना घडली आहे. सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच कांद्याला प्रति क्विंटल ७ हजार ४०० रुपये एवढा विक्रमी दर मिळाला. शुक्रवारी बाजार समितीमध्ये केवळ १३ ट्रक कांद्याची आवक झाली.सोलापूर मार्केटमध्ये गेल्या आठवड्यापासून कांद्याची आवक कमी झाली आहे. १७ आॅगस्टला येथे प्रति क्विंटल ५ हजार ३५० रुपये दर मिळाला़ त्यानंतर सातत्याने भाव वाढत आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी कांद्याला ७ हजार ४०० रुपये दर मिळाला. त्याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना होईल. कारण बाजारात अजून नवीन कांदा आलेला नाही़ गेल्या वर्षी आंध्रातील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कमी दरात घेतलेला कांदा ते आता बाजारात आणत आहेत़, अशी माहिती बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी दिली.(प्रतिनिधी)