शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलमध्येच कृषिपंपाचा रिमोट कंट्रोल

By admin | Updated: October 12, 2015 05:29 IST

लोडशेडींगमुळे रात्री-अपरात्री येणाऱ्या विजेमुळे शेतकऱ्यांचे हाल होऊ नयेत म्हणून पुण्याच्या एका युवकाने नामी शक्कल लढवली आहे.

मनोहर कुंभेजकर, मुंबईलोडशेडींगमुळे रात्री-अपरात्री येणाऱ्या विजेमुळे शेतकऱ्यांचे हाल होऊ नयेत म्हणून पुण्याच्या एका युवकाने नामी शक्कल लढवली आहे. शेतीला पाणी देणाऱ्या मोटरचा स्वीच मोबाइलवरून चालू बंद करणाऱ्या उपकरणाचा शोध पुण्याच्या शरद काळेने लावला आहे.काळे यांनी सांगितले की, ‘शेतकऱ्यांना मध्यरात्री शेतात जाऊन मोटर सुरू करावी लागते. त्यात सर्पदंश, प्राण्यांचे हल्ले आणि शॉक लागून अनेक शेतकऱ्यांचे मृत्यू होतात. या त्रासापासून हे उपकरण शेतकऱ्यांची सुटका करेल. रात्री करावी लागणारी पायपीटही टळेल.’शरद काळे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. या उपकरणात मोटर चालू बंद करण्यासह अन्यही काही फिचर्सचा समावेश आहे. हे उपकरण मोटरमध्ये बिघाड होण्यापूर्वी ती बंद करते आणि तशी माहिती फोन करून शेतकऱ्याला कळवते, असा दावाही काळे यांनी केला आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता यावे, म्हणून ‘महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित’ (एमएआयडीसी) ही संस्था काळे यांना मदत करणार आहे.