शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

‘कोकण सम्राट’ रॉकिंग!

By admin | Updated: June 9, 2015 03:30 IST

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शोधलेल्या साकाविरहित आणि दरवर्षी हमखास उत्पादन देणाऱ्या ‘कोकण सम्राट’ या आंबा कलमांना राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

शिवाजी गोरे, दापोलीडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शोधलेल्या साकाविरहित आणि दरवर्षी हमखास उत्पादन देणाऱ्या ‘कोकण सम्राट’ या आंबा कलमांना राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मात्र, कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले व दापोली फळ संशोधन केंद्रात कोकण सम्राट कलमाची रोपे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अजून पाच ते दहा वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले फळसंशोधन केंद्रातील डॉ. भरत साळवी, डॉ. अविनाश शिंदे, डॉ. मुराद बुरोंडकर या शास्त्रज्ञांनी १९९७मध्ये साकाविरहित आणि दरवर्षी हमखास उत्पादन देणाऱ्या जातीच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले. तब्बल १६ वर्षांच्या अथक प्रयत्नांती त्यांना यश आले. हापूस व इस्रायली जातीच्या टॉमी अ‍ॅटकिन्स या दोन जातीच्या संकरातून ‘कोकण सम्राट’ ही जात विकसित करण्यात आली. हंगामाच्या सुरुवातीला मराठवाडा, विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकणातून कोकण सम्राटला प्रचंड मागणी आहे.

हापूसमधील उणिवा दूर हापूसमधील साका व एक वर्ष आड पीक येणे हे हापूसमधील दोष कोकण सम्राटमध्ये आढळत नाहीत. कोकण सम्राटच्या जातीला दरवर्षी आंबे लागतील आणि त्यामध्ये साका धरणार नाही. वाणाची वैशिष्ट्ये > फळे मध्यम आकाराची २८४.५० ग्रॅम, गराचे प्रमाण ७३.२८ टक्के आहे. एकूण विद्राव्य घटकाचे प्रमाण २०.३० ब्रिक्स आहे. फळाची आम्लता ०.२५ टक्के असून, या वाणामध्ये संयुक्त फुलांचे प्रमाण २७.५२ टक्के आहे.> हापूस आणि वाण असलेला दुसरा संकर आणि परदेशी मादीवाण असलेला हा पहिला संकर आहे. > फायबरचे प्रमाण कमी व चव गोड, रंग आकर्षक> फळमाशी, करपा, बुरशी या रोगांचा फारसा परिणाम होत नाही.‘लोकमत’ने पोहोचवला राज्यभर‘हापूसमधील उणिवा दूर करणारा कोकण सम्राट विकसित’ अशा स्वरूपाची बातमी ‘लोकमत’मध्ये २० आॅगस्ट २०१४ रोजी राज्यभर प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल घेऊन त्याच दिवशी औरंगाबाद, लातूर, बीडपासून अनेक जिल्ह्यांमधून ‘कोकण सम्राट’ची माहिती विचारणारे दूरध्वनी ‘लोकमत’कडेही आले.