शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आनंदवन’साठी कोल्हापूरकरांचा ‘आहेर’

By admin | Updated: September 4, 2015 22:49 IST

३०० पेट्या कपडे रवाना : चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर : येथील जिल्हा परिषदेने ‘जुने कपडे देऊया, आनंदवन फुलवूया’ अशी भावनिक हाक देत संकलित केलेल्या कपड्यांच्या ‘आहेराचा ट्रक’ शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ‘आनंदवन’कडे रवाना करण्यात आला. कपड्यांच्या ३०० पेट्यांनी भरलेला ट्रक पाठविण्यात आला. यामुळे आनंदवनातील कुष्ठरोग्यांना कोल्हापूरकरांच्या मायेची ऊब मिळणार आहे.वर्धा जिल्ह्णातील वरोड्याजवळ बाबा आमटे यांनी १९५२ साली ‘आनंदवन’ची स्थापना केली. सध्या ते साडेतीन हजार कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे. तेथील कुष्ठरोगी लोकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शहर, परिसर, जिल्ह्णातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. संकलित झालेले कपडे रवाना करण्याच्या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, मी नेहमी गरीब, वंचितांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. वाढदिवसानिमित्त मी हार, तुरे, पुष्पगुच्छांऐवजी रद्दी स्वीकारतो. यातून तीन लाख रुपये गोळा झाले आहेत. हे तीन लाख आणि माझ्या फंडातील तीन लाख असे सहा लाख रुपये येथील ‘सावली’ संस्थेला देणार आहे. जिल्हा परिषदेने आनंदवनासाठी कपडे संकलित करण्याचा राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. यापुढेही असेच उपक्रम सुरू ठेवावेत. समाजोपयोगी कार्यक्रमांना सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने पाठबळ दिले जाईल. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, अनेक कुटुंबांकडे औषधे शिल्लक राहतात. चांगल्या स्थितीतील आणि मुदतीमध्ये असलेली औषधे संकलित करून गरीब, गरजूंना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने देण्याचा उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा परिषद पुढाकार घेणार आहे. सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी रक्तदान शिबिरही आयोजित करण्याचा मानस आहे. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, राज्यात चांगले काम करणारी जिल्हा परिषद म्हणून कोल्हापूरचा लौकिक आहे. यापूर्वीही जिल्हा परिषदेने राबविलेले अनेक उपक्रम राज्यातील अन्य जिल्ह्यांत राबविले आहेत. ‘आनंदवन’चे कामही चांगले आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील, उपाध्यक्ष शशिकांत खोत, महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील, सभापती किरण कांबळे, अभिजित तायशेटे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( प्रतिनिधी )साटलोटं...डॉक्टर आणि औषध दुकानदार यांच्यात सध्या साटलोटे दिसते. यातून डॉक्टर रुग्णांना उपचारावेळी भरमसाट औषधे लिहून देत असतात. आजार बरा झाल्यानंतर रुग्णांची अनेक औषधे बंद होतात किंवा बंद केली जातात. पण आणलेली औषधे तशीच घरात शिल्लक राहतात. ती संकलित करून गरजंूना दिल्यास त्याचा फायदा होईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले