पुणे : घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि साताऱ्यातील १ लाख ३२ हजार ३६० नागरीकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, सुमारे एक लाख नागरीक अजूनही अडकून पडले आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला असून, कोल्हापूरला जाणारे सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरशी रस्ते संपर्क तुटला आहे. कोल्हापूरामधे प्रथमच इतका मोठा पूर आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
* अलमट्टीतून चार लाखांचा विसर्ग
कृष्णानदीवर असलेल्या उत्तर कर्नाटकातील अलमट्टी या धरणातून पावणेतीन लाख क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. सध्या कृष्णेत ३ लाख २ हजार क्युसेक पाणी जमा होत आहे. पावसाचा जोर असल्याने बुधवारी पुराचे पाणी ०.१ मीटरने वाढले आहे. तसेच, येथील घाटमाथ्यावर अतीवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अलमट्टीतून चार लाख क्युसेक पर्यंत विसर्ग वाढविण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारकडे केली होती. त्याप्रमाणे विसर्ग वाढविण्यात आला आहे. या धरणातून ५ लाख २० हजार क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविता येवू शकतो. कर्नाटकातील रायचूर येथे पूरस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे आणखी विसर्ग वाढविण्यास कर्नाटक सरकार तयार नाही. अलमट्टीतून किमान साडेचार लाख क्युसेक विसर्ग करावा अशी मागणी असल्याचे विभागीय आयुक्त, डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले. --------------
पूरामुळे झालेले मृत्यू
पुणे ४सातारा ७सांगली २सोलापूर १कोल्हापूर २----------------------
सहाशे गावातील पाणी पुरवठा बंद
पुरामुळे पाणी पुरवठा करणारी यंत्रणा पाण्याखाली गेल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ३९०, सांगलीतील ११३, सातारा ९यथील ९१ गावांतील पाणी पुरवठा बंद असून, कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी बाधित गावातील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. --------------
गावांशी संपर्क तुटला
जिल्हा गावांची संख्या अडकलेल्या नागरीकांची संख्या सुरक्षितस्थळी हलविलेले नागरीक
कोल्हापूर १२९ ३५,५१४ ५१,७८५सातारा ६ ८०० ६२६५सांगली ११ ४९,००० ५३,२२८सोलापूर - - ७,७४९पुणे - - १३,३३६-----------------------पूररेषा लवकरच निश्चित करणारदर पंचवीस वर्षांनी पूररेषा निश्चित केली जाते. त्यात गेल्या पंचवीस वर्षांतील आणि शंभर वर्षांतील सर्वोच्च पावसाचा विचार केला जातो. त्यानुसार हरित (ग्रीन) आणि लाल (रेड) रेषा निश्चित केली जाते. लवकरच या रेषा अंतिम केल्या जातील, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले.
-------------पुणे : ग्रामीण भागातील १०३ मोठे व ४३३ छोटे पुलांपैकी ३४ पुल पाण्याखाली गेले आहेत. त्यातील पुणे महानगरपालिका हद्दीतील ३, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील २, पुणे कॅन्टोन्मेंट १, असे ४० पूल पाण्याखाली गेले आहेत.सातारा : ८ पूल पाण्याखाली गेले असून पर्यायी मार्ग उपलब्धसांगली : सहा राज्यमार्ग, १५ जिल्हामार्ग व इतर सहा जिल्हा मार्ग पाण्याखालीकोल्हापूर : १०४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि ८९ रस्ते पाण्याखाली
--------------------- कोल्हापूरमधे ६ एनडीआरएफ पथके दाखल असून, ६ पथके रवाना होत आहेत. एक नौदल पथक पोहोचले
- सांगलीमध्ये ३ एनडीआरएफ पथके पोहचली, असून ३ पथके रवाना होत आहेत
- साताऱ्यात १ एनडीआरएफ पथक पोहचले
- टेरिटोरिअल आर्मीचीकोल्हापूरमध्ये ४ व सांगलीमध्ये १ पथक कार्यरत