शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
2
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
3
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
4
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
5
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
6
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
7
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
8
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
9
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
10
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
11
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
12
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
13
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
14
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
15
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
16
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
17
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
18
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
19
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
20
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Daily Top 2Weekly Top 5

"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 19:17 IST

मंगळवारी संध्याकाळी जेव्हा तिचा पती श्रीकांत कामावरून परतला तेव्हा घरात असलेल्या शांततेमुळे तो चिंतेत पडला

तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात घडलेल्या एका अजब आणि धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हैराण केले आहे. याठिकाणी मुंग्याच्या भीतीने २५ वर्षीय विवाहित महिलेने टोकाचे पाऊल उचललं आहे. मनीषा असं मृत महिलेचे नाव आहे. पती आणि लहान मुलीला मागे सोडून मनीषाने आत्महत्या केली त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. तेलंगणाच्या अमीनपूर नगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या सर्व होम्स येथे ही घटना घडली. जिथे मनीषा पती श्रीकांत आणि मुलगी अन्वीसोबत राहत होती.

मनीषा मायरमेकोफोबियाने ग्रस्त होती जो एक गंभीर मानसिक आजार आहे. ज्यात तिला मुंग्यांची प्रचंड दहशत वाटत होती. ही फक्त एक साधी भीती नव्हती तर एक असा आजार होता ज्याने तिचे जीवन जिवंत नर्क बनवलं होतं. तिच्या कुटुंबाने या मानसिक समस्येवर उपचार आणि समुपदेशनाचा उपचार सुरू केला होता. परंतु भीतीचं सावट तिच्यावर इतके खोलवर रुजले होते, त्यावर मात करणे तिला अशक्य वाटू लागले. 

बेडरूमचा दरवाजा तोडला, अन् आतमध्ये....

मंगळवारी संध्याकाळी जेव्हा तिचा पती श्रीकांत कामावरून परतला तेव्हा घरात असलेल्या शांततेमुळे तो चिंतेत पडला. बेडरूमचा दरवाजा आतून बंद होता. वारंवार हाक मारून आणि ठोठावूनही मनीषाने प्रतिसाद न दिल्याने अखेर शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. दरवाजा तोडताच आतील दृश्य पाहून सगळेच हैराण झाले. मनीषा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. 

तेलंगणा पोलिसांना मनीषाची सुसाईड नोट सापडली

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेलंगणा पोलिसांना मनीषाची सुसाईड नोट तिच्या खोलीत सापडली, ज्यामध्ये तिच्या वेदनेचे कारण दिले होते. तिने तिच्या पतीला उद्देशून लिहिले, श्री, मला माफ कर..मी या मुंग्यांसोबत राहू शकत नाही असं तिने म्हटलं होते. तर मुलगी अन्वीसाठी शेवटचा संदेश होता,  मुलीची काळजी घ्या असं तिने सांगितले.  मनीषाच्या सुसाईड नोटने संपूर्ण कुटुंबाला हादरवून टाकले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ant Phobia Drives Woman to Suicide; Husband Finds Note

Web Summary : A Telangana woman, suffering from ant phobia, tragically ended her life. She left a suicide note apologizing to her husband and asking him to care for their daughter. Police are investigating.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी