शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

‘केंशव, चलायचं ना!’

By admin | Updated: June 4, 2014 01:11 IST

‘केंशव, अरे चलायचं ना!’ मुंडे मुंबईत असले की त्यांची आपल्या लाडक्या केशवसाठीची (स्वीय साहाय्यक केशव उपाध्ये) ही सानुनासिक हाक ठरलेली असायची.

यदु जोशी - मुंबई
‘केंशव, अरे चलायचं ना!’ मुंडे मुंबईत असले की त्यांची आपल्या लाडक्या केशवसाठीची (स्वीय साहाय्यक केशव उपाध्ये) ही सानुनासिक हाक ठरलेली असायची. आता ते शब्द पुन्हा ऐकायला मिळणार नाहीत. साहेबांच्या त्या आवाजासाठी केशवचे कान आसुसलेले राहतील ते कायमचे. कधीही परत न येण्याच्या मार्गावर मुंडेसाहेब निघून गेल़े़़  
कालर्पयत ते उत्साहाने वावरत होते. 26 तारखेला केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होणार हे स्पष्ट झाल्यानंतर दिल्लीतील त्यांच्या बंगल्यावर आनंदाचं वातावरण होतं. हारतुरे येत होते, यशाचा सुगंध दरवळत होता; पण त्यातही मुंडेंच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या त्या प्रमोदजींच्या आठवणीनं़़़ 
‘आज प्रमोदजी अन् माङया आईवडिलांची मला सर्वाधिक आठवण येते. प्रमोदजी नसते तर मी कुठं असतो?’ असे ते ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले अन् तेवढय़ात प्रमोदजींची कन्या पूनम तिथे आल्या. त्यांना प्रेमाने जवळ घेताना हा कणखर नेता अधिकच हळवा झाला़़़ केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या दृष्टीनं, भाजपाच्या दृष्टीनं एक चांगली घटना घडली. ती म्हणजे आपसातील गैरसमज दूर सारून दोन दिग्गज नेते नितीन गडकरी आणि मुंडे एकत्र येऊ पाहात होते. दोघांच्या दोन बैठकाही एका आठवडय़ात झाल्या. तासन्तास बोलणं झालं. दिल्लीनंतर मुंबईत सत्ता आलीच पाहिजे, यासाठी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला एकदिलाने सामोरे जाण्याचंही ठरलं होतं. पण मुंडेंच्या जाण्याने दोघांमधील संबंध हे दुरावा आणि मैत्रीच्या मध्येच कायमचे अडकून राहिले आहेत. 
 
भाजपाचा एक कार्यकर्ता, नेता, आमदार, खासदार, उपमुख्यमंत्री, केंद्रात मंत्री यापैकी कुठली भूमिका तुम्हाला स्वत:ला भावली, असं मुलाखतीच्या ओघात विचारलं तर म्हणाले, संघर्ष करणारा कार्यकर्ता हीच माझी जीवनभर ओळख राहावी, ही इच्छा आहे. समाजातील अनेक घटकांसाठी आयुष्यभर संघर्ष करणा:या या नेत्याला जीवन अन् मृत्यू यांच्यात संघर्ष करण्यासाठी एक क्षणही नियतीनं दिला नाही.
 
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे मुंडे यांचे निकटवर्ती अन् लाडके. महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचे दावेदार कोण, असा वाद आठ-दहा दिवसांपासून झडतोय. त्यात ‘वर नरेंद्र अन् खाली देवेंद्र’ असा नारा दिला गेला. तेव्हा मुंडेंच्या मार्गात आपण अडथळा ठरतोय की काय, या कल्पनेनं अस्वस्थ झालेले फडणवीस त्यांच्या निकटवर्तीयांनी अनुभवले. 
 
गैरसमजांचे मळभ लगेच दूर करण्यासाठी त्यांनी तत्काळ प्रतिक्रिया दिली, ‘मुंडे साहेबांना आम्ही केंद्राकडे तीन महिन्यांसाठी उधार दिलं आहे. त्यानंतर ते महाराष्ट्रात परतून नेतृत्व करतील.’ मुंडे यांच्या अकाली जाण्याने आता ही उधारी कधीच फेडता येणार नाही़़़
 
भाजपा रुजवला
निवडक पत्रकारांशी गप्पा मारताना मुंडे एकदा सांगत होते, पश्चिम महाराष्ट्रात भाजपा वाढविण्याची धडपड मी सुरू केली. मराठय़ांचे प्राबल्य असलेल्या या भागात धनगर आदी जाती जोडू लागलो. पूर्वी मला पुण्याहून कोल्हापूरला कारने जायला चार-साडेचार तास लागायचे; कारण वाटेत कोणी स्वागताला नसायचं. भाजपाचा दूरदूर पत्ता नव्हता. याच मार्गानं जायला मला पुढे नऊ-दहा तास लागत, तेव्हा पक्ष रुजल्याचं समाधान मला मिळालं. एखादा लोकनेता रात्रीतून तयार होत नाही, त्यासाठी काही दशकं लागतात. त्यामुळेच मुंडेंचं अकाली निघून जाणं कार्यकत्र्याना पोरकं करून गेलं. 
 
आज का उशीर 
झाला नाही ?
कुठल्याही कार्यक्रमाला उशिरा पोहोचणं यासाठी मुंडे यांची ख्याती होती. गमतीनं असं म्हणतात की, एकदा ते एका कार्यक्रमाला चक्क एक तास आधी पोहोचले. चौकशी केली असता कळलं की तो आदल्या दिवशीचा कार्यक्रम होता. 
आज राहून राहून वाटतंय, अपघाताच्या त्या जागी, त्याच वेळी मुंडे बरोबर का पोहोचले; तिथेही जरासा एखादा मिनिटाचा उशीर केला असता तर! पण नियतीला ते मान्य नव्हतं. अखेर तिनं डाव साधला.