शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खापर मेरिटाइम बोर्डावर !

By admin | Updated: June 14, 2014 04:41 IST

मेरिटाइम बोर्डाच्या हट्टाने व ‘सीआरझेड’चे नियम डावलून समुद्रकिनाऱ्यावर टाकलेल्या भरावामुळे मुंबईतील अनेक भागांत समुद्राच्या भरतीचे पाणी शिरल्याचे म्हणत महापालिकेने मेरिटाइम बोर्डावर खापर फोडले आहे.

मुंबई : मेरिटाइम बोर्डाच्या हट्टाने व ‘सीआरझेड’चे नियम डावलून समुद्रकिनाऱ्यावर टाकलेल्या भरावामुळे मुंबईतील अनेक भागांत समुद्राच्या भरतीचे पाणी शिरल्याचे म्हणत महापालिकेने मेरिटाइम बोर्डावर खापर फोडले आहे.मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी धडकलेल्या लाटांनी अक्षरश: हाहाकार केला. या पार्श्वभूमीवर या सर्व घटनेला ‘सीआरझेड’चे नियम डावलून मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर भरणी टाकून त्यावर ‘वॉक-वे’ तयार करणारे व अनेक ठिकाणी भरणी टाकून त्यावर ट्रायपॉड टाकणारे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील मेरिटाइम बोर्ड जबाबदार आहे, असे परखड प्रतिपादन महापौर सुनील प्रभू यांनी शुक्रवारी केले आहे.समुद्राच्या भरतीचे पाणी माहीम, वरळी, दादर आदी भागांतील वस्त्यांमध्ये शिरण्याच्या घटनेबाबत एक विशेष उच्चस्तरीय समिती नेमण्याचे व दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश प्रभू यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.महापालिकेला कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता व ‘सीआरझेड’चे नियम डावलून माहीम, दादर व वरळी भागातील स्थानिक आमदारांच्या हट्टाला बळी पडत महाराष्ट्र शासनाच्या मेरिटाइम बोर्डाद्वारे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर भरणी टाकून त्यावर ‘वॉक-वे’ तयार केले आहेत. तर अनेक ठिकाणी भरणी टाकून त्यावर ट्रायपॉड टाकण्यात आले आहेत. ज्यामुळे पर्यावरणाचा आणि निसर्गाचा समतोल बिघडून समुद्राचे पाणी रस्त्यावर व वस्त्यांमध्ये शिरत आहे. याची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे, असेही प्रभू यांनी सांगितले. (प्रतिनिधी)