शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
3
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
4
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
7
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
8
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
9
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
10
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
11
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
12
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
13
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
14
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
16
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
17
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
18
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
19
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
20
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 23:03 IST

Local Body Election Result: कोकणातील कणकवली नगर पंयाचतीच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव करत सनसनाटी विजय मिळवणारे संदेश पारकर यांनी आज उममुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने कोकणातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर या निवडणुकीत विजयी झालेल्या अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना आपल्या गळाला लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, कोकणातील कणकवली नगर पंयाचतीच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव करत सनसनाटी विजय मिळवणारे संदेश पारकर यांनी आज उममुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने कोकणातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

उद्धवसेनेचे नेते असलेल्या संदेश पारकर यांनी शहरविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपाचे उमेदवार समीर नलावडे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. दरम्यान, शिंदेसेनेचे नेते आणि कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी संदेश पारकर यांना पाठिंबा देत त्यांच्या पाठीमागे आपली ताकद उभी केल्याने निवडणुकीत रंगत आली होती. तसेच अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत संदेश पारकर हे १४५ मतांनी विजयी झाले होते. संदेश पारकर यांच्या विजयामध्ये निलेश राणे यांनी दिलेला पाठिंबा निर्णायक ठरल्याचे बोलले जात होते.

दरम्यान, अनेक वर्षांनंतर कणकवलीच्या सत्तेत पुनरागमन केल्यानंतर संदेश पारकर यांची पुढील राजकीय वाटचाल कशी राहील याबाबत उत्सुकता होती. दरम्यान, आज संदेश पारकर यांनी थेट शिंदेसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी पारकर यांच्यासोबत राजन तेली, उदय सामंत, श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते.

संदेश पारकर हे अद्याप उद्धवसेनेतच आहेत. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीत निवडणूक लढवणाऱ्या शहर विकास आघाडीकडून उद्धवसेनेचे काही नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर संदेश पारकर यांची पुढील राजकीय  वाटचाल कशी असेल याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Kankavli Mayor's Visit to Eknath Shinde Sparks Political Speculation.

Web Summary : Kankavli Mayor Sandesh Parkar's meeting with Eknath Shinde fuels speculation about joining Shinde's Shiv Sena. Parkar, who won against BJP with Uddhav Sena support, met Shinde, raising questions about his future political direction after his victory.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५KankavliकणकवलीShiv SenaशिवसेनाSandesh Parkarसंदेश पारकरEknath Shindeएकनाथ शिंदे