शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पदार्पणातच ‘ज्योती, स्वाती’ अव्वल

By admin | Updated: February 2, 2015 04:09 IST

अकलूजच्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेतील व्यावसायिक गटात प्रथमच पर्दापण करणाऱ्या ज्योती, स्वाती पुरंदावडेकर

अकलूज : अकलूजच्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेतील व्यावसायिक गटात प्रथमच पर्दापण करणाऱ्या ज्योती, स्वाती पुरंदावडेकर या पार्टीने नृत्यातील जोश, गाण्यातील आर्जव आणि संगितातील सुरेल ताल यांचा त्रिवेणी संगम साधून नावाजलेल्या पार्ट्यांवर मात करत विजेतेपद पटकावले. या पार्टीला रोख २५ हजार रुपये, स्मृतीचषक प्रदान करण्यात आले.सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीतर्फे अकलूज येथे २३व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी नागेश साळुंखे, सोलापूर निर्मित लावण्यखणी (द्वितीय), महेंद्र बनसोडे, पुणे निर्मित कैरी मी पाडाची (तृतीय), योगेश देशमुख, पुणे निर्मित तुमच्यासाठी काय पण व देवयाणी चंदगडकर, मुंबई निर्मित सोळा हजारांत देखणी यांना विभागून (चतुर्थ) क्रमांक देण्यात आला. या पार्ट्यांना अनुक्रमे २० हजार, १५ हजार, १० हजार व स्मृतीचषक देण्यात आले. स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकात कैरी मी पाडाची पार्टीतील शलाका अंधारे यांना उत्कृष्ट अदेसाठी (५ हजार) तर याच पार्टीतील उत्कृष्ट ढोलकीपटू लक्ष्मी लांबे यांना (१ हजार), उत्कृष्ट पार्श्वगायिका लावण्यखणी पार्टीतील प्राजक्ता महामुनी यांना (१ हजार), उत्कृष्ट पेटीवादक तुमच्यासाठी कायपण पार्टीतील अशोक काळे यांना (१ हजार), उत्कृष्ट तबलावादक मंगेश कलामंच पार्टीतील सुरदास कुडाळकर यांना (१ हजार) तर उत्कृष्ट मुजऱ्यासाठी मंगेश कलामंचाच्या ज्योती स्वाती पुरंदावडेकर पार्टीस (३ हजार) रूपयांचे बक्षीस देण्यात आले. यावेळी लावणी कलावंत पुरस्कार प्राप्त सरलाबाई नांदोरेकर, यंदाच्या मानकरी वैशाली जाधव-परभणीकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)