शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण जानेवारीपासून

By admin | Updated: October 14, 2016 22:02 IST

कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचे काम तीन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात रोहा ते वीर या ४६ किलोमीटर मार्गाचे दुपदरीकरण जानेवारी २०१७ च्या पहिल्या आठवड्यात

ऑनलाइन लोकमतरत्नागिरी, दि. 14 -  कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचे काम तीन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात रोहा ते वीर या ४६ किलोमीटर मार्गाचे दुपदरीकरण जानेवारी २०१७ च्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. हे काम वर्षभरात पूर्ण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी ३४० कोटी रुपये खर्च येणार आहे. उर्वरित दोन टप्प्यांच्या दुपदरीकरणाची निविदा प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी रत्नागिरीमध्ये दिली. कोकण रेल्वे प्रकल्प उभारणीच्यावेळी मृत्युमुखी पडलेले अभियंते व कर्मचारी यांची आठवण म्हणून रत्नागिरीतील कुवारबाव रेल्वे स्थानकावर श्रमशक्ती स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकावर शुक्रवारी सकाळी गुप्ता यांनी पुष्पहार वाहिला. सर्वांनी मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहिली. त्यावेळी त्यांच्यासोबत संचालक राजेंद्र कुमार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक बाळासाहेब निकम, कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य अलिमियॉँ काझी उपस्थित होते. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गुप्ता म्हणाले की, दुपदरीकरणाचे हे तीन टप्प्यांमधील काम येत्या तीन ते चार वर्षात पूर्ण होणार आहे. त्यामुळे रेल्वेचा वेगही वाढणार आहे. मार्गावरील खराब असलेला ३०० किलोमीटर ट्रॅक बदलण्यात आला आहे. आता कोकण रेल्वे मार्ग प्रवासासाठी अत्यंत सुरक्षित आहे. यंदाच्या पावसाळ्यात वरुणराजाने कोकण रेल्वेवर कृपा केली आहे. गणेशोत्सवात २७२ जादा रेल्वे फेऱ्या सोडण्यात आल्या. या फेऱ्यांना भक्तांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सुमारे ४ लाख प्रवाशांची ने-आण रेल्वेने करण्यात आली.नवीन स्थानकांचे काम डिसेंबरमध्ये पूर्ण होणारकोकण रेल्वेमार्गावर नव्याने उभारण्यात येणाऱ्या ११ स्थानकांचे काम वेगाने सुरू आहे. येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत या स्थानकांचे काम पूर्ण होईल, असा विश्वास गुप्ता यांनी व्यक्त केला.