शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

‘ही’ मागणी आपण ताबडतोब मान्य करावी; आव्हाडांची उद्धव ठाकरेंना विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 10:36 AM

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याकडे एक मागणी केली आहे.

ठळक मुद्देजितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीट्विटरच्या माध्यमातून केली विनंतीकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचा विस्फोट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशभरात गेल्या २४ तासांत एक लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी संचारबंदी आणि जमावबंदीसह अनेक निर्बंध लागू केले आहेत. अशातच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रकारांच्या संदर्भात मागणी केली आहे. (jitendra awhad requested uddhav thackeray to give corona vaccine to journalist)

राज्यात कोरोनाची स्थिती वाढत असून, लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी उत्तराखंडमधील सर्व पत्रकारांना कोरोना योद्धा म्हणून घोषित केले असून, कोणत्याही वयोमर्यादेच्या बंधनाशिवाय पत्रकारांना कोरोना लस देण्याचे जाहीर केले आहे. यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांना कोरोना लस देण्याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे. यासंदर्भात एक ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. 

ही मागणी आपण ताबडतोब मान्य करावी ही विनंती

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत पत्रकारांना लस देण्याची मागणी केली आहे. आज आपल्या एका पत्रकार मित्राचे कोरोनामुळे निधन झाले.मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो कि, राज्यातील जेवढे पत्रकार आहेत, जे संकटाला सामोरे जाऊन आपल्याला माहिती देत असतात, समाजाला जागृत ठेवत असतात. त्यांना लस देणेजरुरीचे आहे. त्यांची ही मागणी आपण ताबडतोब मान्य करावी ही विनंती, असे आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

CoronaVirus Update: देशभरातील 'या' १० राज्यांत ९१ टक्के कोरोनाबाधित; सर्वाधिक मृत्यूदर

राज्यात कडक निर्बंध

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारची दुकाने, बाजारपेठा, उपाहारगृहे, खासगी कार्यालये, मॉल्स ३० एप्रिलपर्यंत पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शनिवार आणि रविवारी संचारबंदी, रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी, दिवसा जमावबंदी, असे विविध निर्बंध लागू करीत राज्य सरकारने राज्यात अंशत: लॉकडाउनच लागू केला. मात्र, रेल्वे व रस्ते वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नसून, वृत्तपत्र वितरणासही मुभा देण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईमधील रुग्णवाढीने रविवारी नवा उच्चांक गाठला असून, तब्बल ११ हजार १६३ मुंबईकरांना कोरोनाची लागण झाली. तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील रुग्ण वाढीचा दर १.६१ टक्के झाला असून, रुग्णदुपटीच्या कालावधीत मोठी घसरण झाली आहे.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJitendra Awhadजितेंद्र आव्हाडUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणJournalistपत्रकार