शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
3
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
4
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
5
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
6
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
7
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
8
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
9
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
10
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
11
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
12
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
13
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
14
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
15
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
16
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
17
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
18
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
19
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
20
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
Daily Top 2Weekly Top 5

‘जेट’ने केली क्षमतेपेक्षा जास्त तिकीट विक्री

By admin | Updated: May 27, 2015 01:42 IST

जेट एअरवेजने नागपुरात मात्र विमानाच्या क्षमतेपेक्षा जास्तीची तिकिटे विकली आणि प्रवाशांना ‘अ‍ॅडजेस्ट’ करण्याच्या नावाखाली अर्धा तास विमान लेट केले.

मुंबई : एकीकडे रिपाइं नेते रामदास आठवले यांना पाच मिनिटे उशीर झाल्याचे कारण सांगत बोर्डिंग केलेले असताना विमान प्रवास नाकारणाऱ्या जेट एअरवेजने नागपुरात मात्र विमानाच्या क्षमतेपेक्षा जास्तीची तिकिटे विकली आणि प्रवाशांना ‘अ‍ॅडजेस्ट’ करण्याच्या नावाखाली अर्धा तास विमान लेट केले. नागपूरहून जेट ९ डब्ल्यू ७००५ चे विमान सकाळी ११ वाजता मुंबईला निघाले होते. या विमानाची इकॉनॉमी क्लासची जास्तीची तिकिटे विकली गेली. जास्तीच्या प्रवाशांना कसे सामावून घ्यायचे, असा प्रश्न जेटच्या लोकांना पडला. बिझनेस क्लासमध्ये फक्त एकच तिकीट विकले गेले होते. बाकीच्या जागा रिकाम्या होत्या. त्या जागी काही प्रवाशांनी बसावे यासाठी प्रयत्न सुरू झाले. तेदेखील जास्तीचे पैसे देऊन! प्रवाशांत माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक होते. त्यांना विचारले गेले. त्यांनी नकार दिल्यानंतर नागपूरचे साहा. पोलीस आयुक्त राजवर्धन यांनाही विचारणा झाली तेव्हा त्यांनीही नकार दिला. दरम्यान, जे प्रवासी विमानात बसले होते ते उकाड्याने हैराण झाले होते कारण एसीही चालू केलेला नव्हता. या सगळ्या नाट्यात अर्धा तास गेला आणि ११ चे विमान साडेअकरानंतर उडाले. त्यामुळे प्रवाशांमध्ये जेटच्या व्यवस्थापनाबद्दल संताप व्यक्त होत होता. क्षमतेपेक्षा जास्त तिकिटे कशी विकली जातात, याची विमान पत्तन प्राधिकरणाने चौकशी करावी, अशी मागणीही प्रवाशांनी केली. (प्रतिनिधी)