शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

जयंतरावांची नजर ‘कृष्णा’च्या गरम हवेवर

By admin | Updated: May 15, 2015 00:00 IST

खेळ्यांना प्रारंभ : गनिमीकाव्याने अंतिम टप्पा गाठण्याची चाल, तिन्ही गटांच्या संपर्कात कार्यकर्ते

अशोक पाटील -इस्लामपूरयशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच तिन्ही गटाच्या नेत्यांनी प्रचाराच्या माध्यमातून हवा तापवली आहे. या हवेचा अंदाज माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी घेतला आहे, परंतु आपण त्या रस्त्याला नाहीच, असे ते सांगत आहेत. तथापि त्यांचे कार्यकर्ते मात्र तिन्ही गटातील नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे जयंत पाटील अंतिम टप्प्यात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.कारखान्याच्या मागील निवडणुकीत जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी अविनाश मोहिते यांना ताकद दिली होती. जयंत पाटील यांच्याच सांगण्यावरून कार्यकर्त्यांनी ही पाठराखण केली होती. यावेळच्या निवडणुकीत मात्र जयंत पाटील यांनी स्वत:ची भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. असे असले तरी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवेळी संपर्क दौऱ्यात ते ‘कृष्णा’च्या निवडणुकीच्या तापलेल्या हवेचा अंदाज घेत असल्याचे जाणवत होते. सध्या ते यावर भाष्य करण्यास तयार नाहीत, परंतु तिन्ही गटांचे नेते त्यांच्या संपर्कात असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.निवडणुकीच्या रणांगणात उतरायचेच, असा निश्चय करून डॉ. सुरेश भोसले संपर्क दौरा वाढवला आहे. तगडे उमेदवार देण्यासाठी भोसले गट युध्दपातळीवर कामाला लागला आहे, तर डॉ. इंद्रजित मोहिते यांनी वडिलांपासून एकनिष्ठ असलेला गट कायम ठेवत उमेदवारी देताना ज्येष्ठांना संधी देण्याचा विचार केला आहे. अंतिम क्षणी मदनराव मोहिते आणि इंद्रजित मोहिते हेच उमेदवारी निश्चित करणार आहेत. सत्ताधारी अविनाश मोहिते हे मात्र सध्या असलेल्या सवंगड्यांनाच सोबत घेण्याची शक्यता आहे.या तिघांच्याही हालचालींवर जयंत पाटील यांचे बारीक लक्ष आहे. साखर कारखानदारी सक्षमपणे चालवण्यात जयंत पाटील यांचा हातखंडा आहे. सध्या ते राजारामबापू कारखान्याच्या माध्यमातून चार युनिट चालवत आहेत. चारही ठिकाणी त्यांनी समान ऊसदर दिला आहे. आता त्यांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केल्याने अंतिम टप्प्यात ते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.थंड व्हा!‘कृष्णा’च्या निवडणुकीकडे कशा पध्दतीने पाहता, या प्रश्नावर जयंत पाटील यांनी, स्वत:जवळची थंड पाण्याची बाटली पुढे करत ‘हे पाणी प्या आणि थंड घ्या’, अशी प्रतिक्रिया देऊन याबाबत बोलणे टाळले.