जयंत नारळीकरांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

By Admin | Updated: December 19, 2014 17:26 IST2014-12-19T17:26:28+5:302014-12-19T17:26:28+5:30

ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला.

Jayant Naralikar gets Sahitya Akademi award | जयंत नारळीकरांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

जयंत नारळीकरांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १९ - ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. देशातील साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठीत समजला जाणा-या साहित्य अकादमी पुरस्कारांची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. जयंत नारळीकर यांच्यासोबतच साहित्यिक माधवी सरदेसाय यांना सुध्दा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. जयंत नारळीकर यांना 'चार नगरातले माझे विश्व' या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून माधवी सरदेसाय यांना कोकणी भाषेतील मंथन या लेखसंग्रहासाठी गौरवण्यात येणार आहे. जयंत नारळीकर यांनी या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला आहे. 

 

Web Title: Jayant Naralikar gets Sahitya Akademi award