शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

कारागृह परिसरात जॅमर

By admin | Updated: July 23, 2014 00:55 IST

येथील मध्यवर्ती कारागृहात सुरू असलेला अनागोंदी कारभार रोखण्यासाठी कारागृह परिसरात जॅमर लावण्यात आल्याची माहिती आहे. लोकमतने ११ जुलैच्या अंकात ठळकपणे कारागृहातील अनागोंदीची

अनागोंदीची गंभीर दखल : दोषी अधिकाऱ्यांवरही लवकरच कारवाई नागपूर : येथील मध्यवर्ती कारागृहात सुरू असलेला अनागोंदी कारभार रोखण्यासाठी कारागृह परिसरात जॅमर लावण्यात आल्याची माहिती आहे. लोकमतने ११ जुलैच्या अंकात ठळकपणे कारागृहातील अनागोंदीची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. त्या अनुषंगाने प्रभावी उपाययोजना केल्या जाणार असल्याचे वृत्तात नमूद केले होते, हे विशेष! भक्कम तटबंदी आणि राज्यातील अतिसुरक्षित कारागृहांपैकी एक कारागृह म्हणून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाचे नाव आहे. त्यामुळेच येथील मध्यवर्ती कारागृहात बॉम्बस्फोटातील दहशतवादी, नक्षलवादी, मुंबई अंडरवर्ल्ड डॉन (अरुण गवळी), त्यांचे शूटर, पाकिस्तान तसेच अन्य विदेशी कैद्यांना ठेवण्यात आले आहे. असे खतरनाक गुन्हेगार कारागृहात असतानादेखील खतरनाक कैद्यांना कारागृहातील बराकीतच अंडी, चिकन, मटन, तंदूर, बिर्याणी आणि थंडगार बीअरसह महागड्या (ब्रॅण्डेड) दारूच्या बाटल्या, गांजा, गर्द, चरस असे अमली पदार्थ पुरविले जातात. कारागृहात मोबाईलच्या वापरावर बंदी आहे. मात्र, भ्रष्ट अधिकाऱ्यांना यातून हजारो रुपये मिळत असल्यामुळे गुंडांना कारागृहात मोबाईल उपलब्ध करून दिले जातात. हे गुंड (कैदी) मोबाईलवरून शहरातील आपल्या चेल्याचपाट्यांसोबत तसेच व्यापारी, उद्योजकांसोबत संपर्क साधून त्यांना धमक्या देतात. खंडणी मागतात. कोट्यवधींच्या वादग्रस्त जमिनीच्या आतूनच (मोबाईलच्या माध्यमातून) मांडवल्या करतात आणि लाखो रुपये पदरी पाडून घेतात. या पैशातूनच त्यांचे चेलेचपाटे संबंधित गुंडांच्या कोर्ट कारवाईची आणि कारागृहातील ऐषोआरामाची व्यवस्था करतात. याबाबत राज्य सरकार, गृहमंत्री, कारागृह प्रशासनाकडे तक्रारीही केल्या. लोकमतने या अनागोंदी कारभाराचा वेळोवेळी पाठपुरावा केला. राज्याच्या तुरुंग महानिरीक्षक (एडीजी) मीरा बोरवणकर यांच्याशी संपर्क साधून, कारागृह प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार, अशी विचारणा केली होती. यावेळी त्यांनी येथील कारागृह उपमहानिरीक्षक शशिकांत शिंदे सध्या सुटीवर आहेत. ते परतल्यानंतर अहवाल मागितला जाईल आणि कारवाईचे स्वरूप ठरेल,असे बोरवणकर यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर, चार दिवसांपूर्वी कारागृहात जॅमर लावण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे मोबाईलचा वापर थांबेल आणि कारागृहातील गुंडांकडून दिल्या जाणाऱ्या धमक्या, खंडणी वसुली तसेच मांडवल्याही थांबण्याची अपेक्षा आहे. या प्रकारानंतर आता अन्य गैरप्रकार रोखण्याचेही प्रयत्न सुरू झाले असून, दोषी अधिकाऱ्यांवरही लवकरच कारवाई केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. (प्रतिनिधी)