"जग कितीही पुढे गेले तरी पाणी बनवता येत नाही, हे सत्य आहे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 14:35 IST2021-02-22T14:31:58+5:302021-02-22T14:35:25+5:30

chief minister uddhav thackeray : पनवेल येथील न्हावा शेवा टप्पा 3 पाणी पुरवठा योजनेच्या उद्धाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

"It's true that no matter how far the world goes, water can't be made" - uddhav thackeray | "जग कितीही पुढे गेले तरी पाणी बनवता येत नाही, हे सत्य आहे"

"जग कितीही पुढे गेले तरी पाणी बनवता येत नाही, हे सत्य आहे"

ठळक मुद्देविकास, उद्योग हवा आहे. मात्र जीव घेणा विकास नको. संकटांना आपणच आमंत्रण देत आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई : कालच मी आवाहन केले की गर्दी नका म्हणून आणि हा आज कार्यक्रम ठेवला. मात्र, हा पाण्यासारख्या महत्वाचा कार्यक्रम असल्याने ठेवला असल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

पनवेल येथील न्हावा शेवा टप्पा 3 पाणी पुरवठा योजनेच्या उद्धाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी जग कितीही पुढे गेले तरी पाणी बनवता येत नाही, हे सत्य आहे. विकास, उद्योग हवा आहे. मात्र जीव घेणा विकास नको. संकटांना आपणच आमंत्रण देत आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

याचबरोबर, कोरोनाच्या संकट आल्यावर लॉकडाऊनच्या काळात प्रदूषणाची पातळी खालावली होती. ही चांगली बाब आहे. मात्र, पुन्हा एकदा प्रदूषण वाढत चालले आहे. स्वातंत्र्य 75 वर्षांनंतरही पिण्याचे पाणी आपण देऊ शकत नसल्यास खूप वाईट आहे. मंगळावर पाणी शोधण्यपेक्षा जमिनीवर प्रदूषण शोधा, असे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

कठोर निर्णय घेण्याची वेळ शासनावर आणू नका - अजित पवार
राज्यात कोरोनासंदर्भात कठोर निर्णय घेण्याची वेळ शासनावर आणू नका, याकरिता नियमांचे पालन करा, असे अवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला केले आहे. लॉकडाऊनमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईला जाते. रोजंदारीवरील कामगारांना चूल पेटवता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे अजित पवार म्हणाले. 

भविष्यात पाण्यासाठी युद्ध होणार आहेत. अनेक राज्यात पाण्याचे वाद झाले आहेत. हे वाद जिल्हा, तालुका, गावात पोहोचले आहे. पाण्याचा थेंब साठविणे गरजेचे आहे. पाणी जीवन आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकांना पाण्याचे महत्व पटवून दिले पाहिजे. लोकांना जल साक्षर करण्याची आता वेळ आली आहे, असेही अजित पवार म्हणाले.
 

Web Title: "It's true that no matter how far the world goes, water can't be made" - uddhav thackeray