शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

इस्रोच्या मोहिमेत मोलाचा वाटा

By admin | Updated: June 8, 2017 01:08 IST

भारताने आजवर अनेक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवालचंदनगर : भारताने आजवर अनेक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. सोमवारी (दि. ५) भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या माध्यमातून जीएसएलव्ही एमके-थ्री डी-१ प्रक्षेपकाच्या साह्याने जीसॅट १९ या दूरसंचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. त्यात आजवरच्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहापैकी हा उपग्रह सर्वाधिक वजनाचा होता. त्या उपग्रहाचे काही भाग वालचंदनगर कंपनीने बनवले आहेत. या यशस्वी कामगिरीमुळे वालचंदनगर कंपनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.भारतीय अवकाश संशोधन संस्थेने प्रक्षेपण केलेले व इस्रोने आजपर्यंत सोडलेल्या उपग्रहांपैकी या उपग्रहाचे वजन ३ हजार १३६ किलो असून यापुढे भारत या यशस्वी उड्डाणामुळे ४ हजार किलो वजनाचा उपग्रह सोडू शकणार आहे. सोमवारी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन या अवकाश केंद्रातून सायंकाळी साडेपाच वाजता हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. या उपग्रहामुळे इंटरनेट सेवा वेगवान होण्यास मदत होणार आहे. या यशस्वी मोहिमेत मोठी प्रगती होणार आहे. याचा फायदा भविष्यात अशाच यानातून संशोधक मनुष्यही अवकाशात सोडणे भारताला सोपे जाणार आहे. या यानाला लागणाऱ्या भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनचा वापर करण्यात आलेला आहे. या यशस्वी उड्डाणासाठी वालचंदनगर कंपनीने एस २०० स्ट्रप आॅन मोटर केस हे महत्त्वाचे भाग बनवले आहेत. या यानाच्या दोन्ही बाजूला ते भाग बसवलेले असून यात हेड अँड सेग्मेंट मिडल सेग्मेंट व झोनल सेग्मेंट बसवण्यात आलेले आहे. यानाला दिशा देण्यासाठी त्याचा उपयोग झाला आहे.ही कंपनी १९०८ पासून कार्यरत असून ४५ वर्षांपासून भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत आहे. यापूर्वीच्या यशस्वी करण्यात आलेल्या मंगळायन मोहिमेत याच कंपनीच्या माध्यमातून यानाच्या मुख्य भागाची निर्मिती करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे भारतीय संशोधनामुळे फेब्रुवारी महिन्यात जगातील सर्वांत मोठा उपग्रह सोडण्यात आला, त्यात १०४ उपग्रह सोडण्यात भारताने विश्वविक्रम केला त्या १०४ उपग्रहांत या वालचंदनगर कंपनीची मोलाची कामगिरी होती. त्यामुळे भारतीय उपग्रहात मोलाची कामगिरी करीत गेल्यामुळे कंपनीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी जी. के. पिल्लाई यांनी दिली.