शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे महामंडळ हे राज्य शासन नाही

By admin | Updated: September 6, 2016 05:00 IST

शासकीय कंत्राट अस्तित्वात असताना निवडणूक जिंकलेल्या लोकप्रतिनिधीला अपात्र ठरविण्याची तरतूद महामंडळाच्या कंत्राटाच्या बाबतीत लागू होत नाही

राकेश घानोडे,

नागपूर- विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ हे राज्य शासन नाही. यामुळे शासकीय कंत्राट अस्तित्वात असताना निवडणूक जिंकलेल्या लोकप्रतिनिधीला अपात्र ठरविण्याची तरतूद महामंडळाच्या कंत्राटाच्या बाबतीत लागू होत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी एका निवडणूक याचिकेत दिला आहे.लोकप्रतिनिधित्व कायदा-१९५१ मधील कलम ७(ए) मध्ये योग्य शासनाची व्याख्या देण्यात आली आहे तर, कलम ९-ए मध्ये कंत्राटदार लोकप्रतिनिधीच्या अपात्रतेसंदर्भात तरतूद आहे. शासनासोबतचे कंत्राट अस्तित्वात असताना निवडणूक जिंकणारा उमेदवार कलम ९-ए मधील तरतुदीनुसार अपात्र ठरतो. परंतु, कलम ७(ए) मध्ये दिलेली योग्य शासनाची व्याख्या विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला लागू होत नाही. परिणामी महामंडळासोबत कंत्राट अस्तित्वात असताना निवडणूक जिंकलेला उमेदवार कलम ९-ए मधील तरतुदीच्या परिघात येत नाही असे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले आहे.>याचिकाकर्त्याचा दावा खारीजपाटबंधारे महामंडळाच्या सर्व व्यवहारांवर राज्य शासनाचे नियंत्रण आहे. राज्याचे पाटबंधारे मंत्री महामंडळाचे पदशिद्ध अध्यक्ष असतात व शासनाचे कर्मचारी महामंडळात प्रतिनियुक्तीवर कामे करतात. यामुळे महामंडळाला कलम ९-ए मधील तरतूद लागू होते. भांगडिया यांच्या फर्मला महामंडळाकडून विविध कामांची कंत्राटे मिळाली होती. ही कामे निवडणूक काळातही सुरू होती. यामुळे ते अपात्र ठरतात असा दावा याचिकाकर्त्याने केला होता. हा दावा खारीज झाला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. मनीष जोहरापूरकर यांनी बाजू मांडली.पाटबंधारे महामंडळ हे राज्य शासन नाही.सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा सादरसर्वोच्च न्यायालयाने ‘श्रीकांत वि. वसंतराव व इतर’ प्रकरणात गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ हे राज्य शासन नाही असे स्पष्ट केले आहे. तसेच, महामंडळासोबत कंत्राट असणे म्हणजे ते राज्य शासनाचे कंत्राट होय असे म्हणता येत नसल्याचे सांगितले आहे. हा निवाडा भांगडिया यांच्यातर्फे उच्च न्यायालयात सादर करण्यात आला होता.>पाटबंधारे महामंडळ स्वायत्त संस्थापाटबंधारे महामंडळ स्वायत्त संस्था आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ कायदा-१९९७ अंतर्गत ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. यामुळे या संस्थेला राज्य शासन म्हणता येणार नाही. कलम ७(ए) मध्ये योग्य शासनाची व्याख्या देण्यात आली आहे. या प्रकरणात योग्य शासन म्हणजे राज्य शासन होते, असे भांगडिया यांच्यातर्फे सांगण्यात आले. भांगडिया यांच्यातर्फे अ‍ॅड. आनंद परचुरे व अ‍ॅड. सौरभ चौधरी यांनी कामकाज पाहिले.>चिमूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपाचे उमेदवार कीर्तिकुमार भांगडिया यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेत प्राथमिक आक्षेपाचा मुद्दा निकाली काढताना न्यायालयाने हा निर्वाळा दिला आहे. भांगडिया यांना अपात्र ठरविण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार गजानन बुटके यांनी ही निवडणूक याचिका दाखल केली आहे.