मुंबईतील अंधेरी-मरोळ येथे होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा घाऊक मासळी बाजार प्रकल्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 14:56 IST2026-02-13T14:52:52+5:302026-02-13T14:56:15+5:30
Mumbai News: मुंबईतीस अंधेरी-मरोळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा घाऊक मासळी बाजार प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला प्रशासक्कीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.

मुंबईतील अंधेरी-मरोळ येथे होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा घाऊक मासळी बाजार प्रकल्प
मुंबईतीस अंधेरी-मरोळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा घाऊक मासळी बाजार प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला प्रशासक्कीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.
यासंदर्भात सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये नितेश राणे म्हणाले की, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या सन २०२५-२६ च्या वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली असून, त्यामध्ये मुंबईतील मरोळ (अंधेरी) येथे १३८ कोटी रुपयांच्या आधुनिक घाऊक मासळी बाजार प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
मासेमारी असतानाच्या बंद कालावधीत पारंपरिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील सुमारे २,८१६ लाभार्थ्यांना उपजीविका व पोषण सहाय्य देण्याचाही समावेश आहे. या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला, याचे आज फलित झाल्याचे समाधान वाटते, असेही नितेश राणे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मुंबई अंधेरी-मरोळ येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या घाऊक मासळी बाजार प्रकल्पास प्रशासकीय मान्यता!
— Nitesh Rane (@NiteshNRane) February 12, 2026
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) अंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या सन 2025-26 च्या वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली असून, त्यामध्ये मुंबईतील मरोळ (अंधेरी)… pic.twitter.com/p2lmKUHTVi
मुंबईसारख्या महानगरात आंतरराष्ट्रीय दर्जाचा घाऊक मासळी बाजार उभारणे ही काळाची गरज होती. या प्रकल्पामुळे केवळ व्यापार सुलभ होणार नाही, तर हजारो मासेमार व संबंधित घटकांना रोजगार आणि स्थैर्य मिळेल. महाराष्ट्रात ‘ब्ल्यू इकॉनॉमी’ मजबूत करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा ठाम विश्वास वाटतो, असेही नितेश राणे यांनी सांगितले.