शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

नकली खतांचे आंतरराज्यीय रॅकेट सक्रिय

By admin | Updated: June 26, 2014 00:45 IST

अमरावती जिल्ह्यात सोमवार व मंगळवारी पकडण्यात आलेले नकली रासायनिक खत मध्यप्रदेशातील इंदूर येथून आणण्यात आले. भंडारा जिल्ह्यात नकली कंपनीच्या नावानेच पॅकिंग करण्यात आले

गजानन मोहोड /अमरावतीअमरावती जिल्ह्यात सोमवार व मंगळवारी पकडण्यात आलेले नकली रासायनिक खत मध्यप्रदेशातील इंदूर येथून आणण्यात आले. भंडारा जिल्ह्यात नकली कंपनीच्या नावानेच पॅकिंग करण्यात आले आणि विदर्भाच्या ग्रामीण भागात डिल्पी, एसएसपी नावाने विकल्या जात असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. मंगळवारी अमरावती जिल्ह्यातील मुर्तिजापूर (तरोडा) ग्रामपंचायतीच्या गोदामात धाड घालून कृषी विभागाने बनावट खते जप्त केली होती. ‘भुसील सिलॉकॉन ६५ टक्के अ‍ॅग्रोकेमिकल्स, पेट्रोलपंपजवळ (ठाणा) जि. भंडारा’ असा पत्ता अंकित असलेल्या बनावट रासायनिक कंपनीच्या एस.एस.पी. (सिंगल सुपर फॉस्फोट) नावाने कृषी खताची ग्रामीण भागात विक्री होत आहे. यापूर्वी अमरावती जिल्ह्यातील आसरा येथे डीएपी या नावाखाली भुवरदान (दानेदार) अ‍ॅग्रोकेमिकल्स, भंडारा असे छापले असलेल्या बनावट रासायनिक खताच्या ६४ बॅगा १००० रुपये प्रतिबॅगप्रमाणे विकण्यात आल्या. तसेच गावात आगाऊ बुकिंग करुन हजारो रुपये जमा करण्यात आले. ही माहिती मिळताच कृषी विभागाने आणखी माल पाहिजे, असे सांगून या कंपनीच्या फिल्ड आॅफिसरला शिताफीने बोलावून त्याला पकडण्यात यश मिळविले. मयूर देशपांडे (रा. भंडारा) असे त्याचे नाव आहे. दुसरा सुमित मेश्राम (रा. अमरावती) हा पसार झाला.अटकेतील आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर या बनावट कंपनीचा फिल्ड आॅफिसर असे भासवून कृषी खतांची विक्री केल्याचे सांगितले. त्याच्या माहितीवरुन तिवसा तालुक्यातील मूर्तिजापूर (तरोडा) येथील गोदामावर कृषी विभागाने धाड घालून बनावट एसएसपी नावाच्या १०० बॅग जप्त केल्या आहेत. गावातील काही शेतकऱ्यांना त्याने या खताची विक्री केल्याचे सांगितले. याप्रकरणी भातकुली व तिवसा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.