इंद्राणी मुखर्जीने दिली गुन्ह्याची कबुली ?

By Admin | Updated: September 2, 2015 10:34 IST2015-09-02T10:34:01+5:302015-09-02T10:34:01+5:30

तब्बल आठवडाभराच्या चौकशीनंतर इंद्राणी मुखर्जी शीना बोरा हत्याप्रकरणात सहभागी असल्याची कबुली दिल्याचे समजते.

Indrani Mukherjee confessed to crime? | इंद्राणी मुखर्जीने दिली गुन्ह्याची कबुली ?

इंद्राणी मुखर्जीने दिली गुन्ह्याची कबुली ?

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २ - तब्बल आठवडाभराच्या चौकशीनंतर इंद्राणी मुखर्जी शीना बोरा हत्याप्रकरणात सहभागी असल्याची कबुली दिल्याचे समजते. सोमवारी मुलगी विधीची भेट झाल्यानंतर इंद्राणीने अखेर मौन सोडले असून शीनाची हत्या झाल्याची कबुली तिने दिली आहे.

शीना बोरा हत्याप्रकरणात इंद्राणी, तिचा दुसरा पती संजीव खन्ना व चालक श्याम रॉय या तिघांची पोलिसांनी कसून चौकशी केली होती. मात्र इंद्राणीने सुरुवातीला चौकशीत पोलिसांना कोणतीही माहिती दिली नव्हती. शीना जीवंत असून ती अमेरिकेत असल्याचे इंद्राणीने भासवले होते. मात्र सोमवारी इंद्राणीची तिची मुलगी विधी व वकिलांची न्यायालयात भेट झाली होती. या भेटीत इंद्राणीला संजीव खन्ना व श्याम रॉयने गुन्ह्यातील सहभाग कबुल केल्याचे समजले. यानंतर पोलिस चौकशीत इंद्राणीने या गुन्ह्याची कबुली दिल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे. मात्र या हत्येचे कारण तिने सांगितलेले नाही असे एका अधिका-याने संबंधीत वृत्तपत्राला सांगितले आहे. 

Web Title: Indrani Mukherjee confessed to crime?