शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण सामग्रीच्या निर्मितीचे स्वदेशीकरण

By admin | Updated: October 1, 2015 03:24 IST

आगामी पाच ते सहा वर्षांत संरक्षण उत्पादनात ७० टक्क्यांहून अधिक स्वदेशीकरणाचे उद्दिष्ट गाठू. त्यासाठी लघू-मध्यम उद्योगांना संरक्षण खरेदी व निर्मितीत भागीदार बनविण्याचे

मुंबई : आगामी पाच ते सहा वर्षांत संरक्षण उत्पादनात ७० टक्क्यांहून अधिक स्वदेशीकरणाचे उद्दिष्ट गाठू. त्यासाठी लघू-मध्यम उद्योगांना संरक्षण खरेदी व निर्मितीत भागीदार बनविण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. त्यादृष्टीने संरक्षण साहित्य खरेदी धोरणाच्या आराखड्यात सुधारणा करण्यात येत आहेत. येत्या दोन-तीन महिन्यांत सुधारित आराखडा जाहीर होईल, अशी ग्वाही संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी मुंबईत दिली. पर्रीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात देशी बनावटीची ‘आयएनएस कोची’ ही विनाशिका नौदलाच्या ताफ्यात सामील झाली. या वेळी पर्रीकर म्हणाले की, संरक्षण सामग्रीच्या खरेदीतही मेक इन इंडियाचे सूत्र स्वीकारण्यात आले असून, खरेदी धोरण ठरविण्यासाठी नेमलेल्या समितीने दिलेला मसुदा सूचना व हरकतींसाठी संरक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर ठेवण्यात आले आहे. यातील सूचनांवर काम सुरू असून, लवकरच कृतीयोग्य आराखडा जाहीर केला जाईल. नवीन आराखड्यात लघु व मध्यम उद्योगांना संरक्षण सामग्री उत्पादनात सहभागी करून घेण्यावर सरकारचा भर आहे. या धोरणामुळे देशत १० ते २० लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. शिवाय ५०० ते ८०० कोटी डॉलरची बचतही होणार असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक साधनसामग्रीच्या निर्मितीबाबत ३५ ते ४० टक्के स्वदेशीकरण करण्यात यश आले. जहाज बांधणीत देशाने मोठी आघाडी घेतली आहे. पर्रीकर पुढे म्हणाले की, सामरिकदृष्ट्या आवश्यक असणारी काही विशिष्ट हेलिकॉप्टर्स अन्य देशांकडून खरेदी करावी लागणार आहेत. सर्वसाधारण कामासाठी उपयोगात येणारी व मोठ्या प्रमाणावर लागणारी हेलिकॉप्टर्स मात्र देशातच बनविण्यात येतील. (प्रतिनिधी)आयएनएस विराट ही विमानवाहू युद्धनौका पुढील वर्षी निवृत्त होत आहे. या नौकेचे संग्रहालयात रुपांतरण करण्यासाठी एखाद्या राज्याने पुढाकार घेतल्यास एक रुपयात ही नौका आम्ही संबंधित राज्याला देऊ. तसे पत्रच देशातील सर्व राज्यांना पाठविल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.