भारतात युद्ध रोखण्याची आणि संपूर्ण जगाला एकजूट करण्याची शक्ती; मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 14:08 IST2026-03-20T14:07:46+5:302026-03-20T14:08:08+5:30

'शांतता प्रस्थापित होण्यासाठी स्वार्थाचा त्याग, एकता आणि चांगल्या मूल्यांचे पालन आवश्यक आहे.'

India has the power to unite the entire world and stop war- Mohan Bhagwat | भारतात युद्ध रोखण्याची आणि संपूर्ण जगाला एकजूट करण्याची शक्ती; मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य

भारतात युद्ध रोखण्याची आणि संपूर्ण जगाला एकजूट करण्याची शक्ती; मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य

Mohan Bhagwat on Iran Crisis: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण विधान केले आहे. जगात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होण्यासाठी स्वार्थाचा त्याग, एकता आणि चांगल्या मूल्यांचे पालन आवश्यक आहे. नागपूर येथे विश्व हिंदू परिषद कार्यालयाच्या भूमिपूजनानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.

संघर्षांचे मूळ कारण स्वार्थ आणि वर्चस्वाची भावना

भागवत यांनी जागतिक संघर्षांच्या मुळाशी स्वार्थ आणि वर्चस्व गाजवण्याची मानसिकता असल्याचे सांगितले. याच कारणामुळे जगभरात युद्धे आणि संघर्ष सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणतात, गेल्या दोन हजार वर्षांपासून जग विविध विचारसरणींच्या माध्यमातून संघर्ष सोडवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र त्यात विशेष यश मिळालेले नाही. धार्मिक असहिष्णुता, जबरदस्ती धर्मांतर आणि श्रेष्ठत्व-हीनत्वाच्या भावना आजही अस्तित्वात असल्याचे त्यांनी नमूद केले.

bभागवत यांनी ठामपणे सांगितले की, सध्या सुरू असलेल्या जागतिक युद्धांना थांबवण्याची क्षमता भारतात आहे. संघर्षात अर्थ नाही, समन्वयातच खरा अर्थ आहे. भारताची ‘सर्व एक आहेत’ ही प्राचीन परंपरा जगाला सौहार्दाचा मार्ग दाखवू शकते. मात्र, त्यासाठी देशात धर्माचे पालन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

धर्म म्हणजे केवळ ग्रंथ नव्हे, आचरणही महत्त्वाचे

आरएसएस प्रमुखांनी धर्माच्या संकल्पनेवर भाष्य करताना सांगितले की, धर्म हा केवळ शास्त्रांपुरता मर्यादित नसून, तो लोकांच्या आचरणातही दिसला पाहिजे. अनुशासन आणि नैतिक मूल्यांचे पालन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

मानवतेचा दृष्टिकोन भारताची ओळख

भागवत यांनी सांगितले की, भारत मानवतेच्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवतो, तर इतर अनेक देश शक्ती आणि वर्चस्वाला अधिक महत्त्व देतात. भारताचे संविधान आणि सांस्कृतिक वारसा हीच विचारसरणी प्रतिबिंबित करतात.

संघर्षाऐवजी सौहार्दाची गरज

जग सध्या विनाशाच्या दिशेने जात असल्याची चिंता व्यक्त करत भागवत म्हणाले की, आजच्या परिस्थितीत संघर्ष नव्हे तर सहकार्य आणि सौहार्दाची आवश्यकता आहे. आधुनिक विज्ञानही हळूहळू ‘सर्व एक आहेत’ या विचाराकडे झुकत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title : भारत युद्ध रोक सकता है, दुनिया को एकजुट कर सकता है: मोहन भागवत

Web Summary : मोहन भागवत का मानना है कि भारत एकता और मूल्यों के माध्यम से वैश्विक संघर्षों को रोक सकता है। उन्होंने जोर दिया कि स्वार्थ युद्धों को बढ़ावा देता है और भारत की एकता की परंपरा सद्भाव ला सकती है यदि धर्म का पालन किया जाए। उन्होंने वैश्विक शांति के लिए चरित्र के महत्व पर प्रकाश डाला, न कि केवल शास्त्रों पर।

Web Title : India can prevent war, unite world: Mohan Bhagwat's statement.

Web Summary : Mohan Bhagwat believes India can halt global conflicts through unity and values. He emphasized that selfishness fuels wars and that India's tradition of oneness can bring harmony if dharma is practiced. He highlighted the importance of character, not just scriptures, for global peace.