शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भ राज्याचा हुंकार

By admin | Updated: July 31, 2014 01:08 IST

स्वतंत्र विदर्भ राज्य ही जनतेची इच्छा असल्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत विदर्भ राज्य घेऊच असा निर्धार बसपाच्या नेतृत्वात आयोजित धरणे आंदोलनादरम्यान विविध विदर्भवादी संघटनांच्या

धरणे आंदोलन : बसपाच्या नेतृत्वात विदर्भवादी संघटना सहभागी नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्य ही जनतेची इच्छा असल्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत विदर्भ राज्य घेऊच असा निर्धार बसपाच्या नेतृत्वात आयोजित धरणे आंदोलनादरम्यान विविध विदर्भवादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला. स्वतंत्र विदर्भ राज्याचे आश्वासन देणाऱ्या राजकीय पक्षांनी आपले आश्वासन पाळावे, अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी बहुजन समाज पार्टी आता मैदानात उतरली आहे. त्याअंतर्गत बसपाने बुधवारी विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये धरणे आंदोलन केले. नागपुरात संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनामध्ये विदर्भ जॉर्इंट अ‍ॅक्शन कमिटीसह विविध विदर्भवादी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी बसपाचे राष्ट्रीय महासचिव व प्रभारी अ‍ॅड. सुरेश माने म्हणाले, बसपा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लहान राज्यांच्या धोरणाचे समर्थक आहे. महाराष्ट्र निर्मितीनंतर व नागपूर करारानंतर सुद्धा विदर्भवासियांना असमतोल विकासास तोंड द्यावे लागले आहे. स्वतंत्र महाराष्ट्राच्या ५४ वर्षात विदर्भ विभागाचा विकास योजनांचा अनुशेष दांडेकर समिती, निर्देशांक समिती यांनी वारंवार स्पष्ट करूनही महाराष्ट्र सरकारने काही ठोस पाऊले व भरीव कामगिरी केलेली नाही. तेलंगाना राज्य निर्मितीनंतर विदर्भवासियांची स्वतंत्र विदर्भ राज्याची तीव्र भावना लक्षात घेऊन बसपा विदर्भाच्या आंदोलनात पूर्ण तयारीनिशी उतरली आहे. तेव्हा विदर्भवादी अस्मितेचा पुरस्कार करीत शेतकरी, युवा व विविध समाज घटकांच्या सामाजिक आर्थिक व राजकीय विकासासाठी स्वतंत्र विदर्भाची भूमिका स्वीकारणाऱ्या राजकीय पक्षांना विदर्भ जनतेने न्याय द्यावा. तसेच विदर्भ विरोधी पक्षांना त्यांची जागा दाखवावी,असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी डॉ. भाऊ लोखंडे, माजी आमदार उपेंद्र शेंडे, किशोर गजभिये, डॉ. उदय बोधनकर यांच्यासह बसपाचे प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले, भाऊसाहेब गोंडाणे, उत्तम शेवडे सागर डबरासे, विश्वास राऊत, विवेक हाडके, प्रफुल्ल माणके, नागोराव जयकर, विदर्भवादी संघटनांचे पदाधिकारी अहमद कादर, श्रीनिवास खांदेवाले, दिपेन अग्रवाल, दीपक निलावार, प्रभाकर कोंडबत्तुनवार, डॉ. नैना धवड, तन्हा नागपुरी, श्याम वाघ, अरुण केदार, गणेश शर्मा, अ‍ॅड. नंदा पराते, ज्ञानेश्वर रक्षक, पृथ्वी गोटे आदींसह बसपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)