शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यसेनानी शांती पटेल यांचे निधन

By admin | Updated: June 14, 2014 04:47 IST

थोर स्वातंत्र्यसेनानी, ज्येष्ठ कामगार नेते आणि समाजवादी विचारसरणीचे गांधीवादी नेते डॉ. शांती पटेल यांचे शुक्रवारी पहाटे ५ वाजता माहीम येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले

मुंबई : थोर स्वातंत्र्यसेनानी, ज्येष्ठ कामगार नेते आणि समाजवादी विचारसरणीचे गांधीवादी नेते डॉ. शांती पटेल यांचे शुक्रवारी पहाटे ५ वाजता माहीम येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ९२ होते. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. यतीन पटेल, स्नुषा श्रुती पटेल, नात स्वरा पटेल व मुली मीनल मोदी आणि मृदुला पटेल असे कुटुंबीय आहे.डॉ. शांती पटेल यांचा जन्म ८ आॅगस्ट १९२२ रोजी गुजरातमधील वीरपूर (बिरपूर) या गावी झाला. वयाची पहिली १५ वर्षे त्यांनी आपल्या मूळ गावीच व्यतीत केली. पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण त्यांनी मातृभाषेतच जन्मगावी घेतले. त्यानंतर, पाचवीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी भाषेत तर सहावी आणि सातवीपर्यंतचे शिक्षण अहमदाबाद येथे घेतले. त्यानंतर, वैद्यकीय शिक्षण वडोदरा येथे घेतल्यानंतर एमबीबीएसच्या पदवीसाठी ते मुंबईत दाखल झाले आणि जे.जे. रुग्णालयातील सरकार मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातून १९५२ साली त्यांनी एमबीबीएसची पदवी संपादन केली. दरम्यानच्या काळात पटेल यांचे शिक्षण सुरू असतानाच ८ आॅगस्ट रोजी महात्मा गांधी यांनी ब्रिटिश साम्राज्याविरोधात ‘छोडो भारत’ आणि ‘करा किंवा मरा’ असा नारा दिला. गांधीवादी विचारांनी भारावून गेलेल्या पटेल यांनी याच वेळी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली आणि ब्रिटिश साम्राज्याविरोधात लढा उभारला.आणि त्यांनी समाजातील कामगार वर्गासह वंचित घटकांसाठी आपला लढा सुरूच ठेवला. १९४४ सालापासून कामगार चळवळीत हिरिरीने काम करणारे पटेल तब्बल ७०हून अधिक संघटनांमध्ये कार्यरत होते.