मुंबई : एका आयकर अधिकाऱ्याने सीएसटी स्थानकातील टीसीला मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेत लोहमार्ग पोलिसांकडून मारहाण करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत टीसीवर हल्ला होण्याची ही चौथी घटना असल्याचे सांगितले जाते. शनिवारी रात्रीच्या सुमारास प्लॅटफॉर्म १४ व १५ च्या प्रवेशद्वाराजवळ टीसी एस. के. गुप्ता कार्यरत होते. त्यांनी ऋषीकुमार सिंह नावाच्या प्रवाशाकडे तिकिटाची विचारणा केली असता तिकीट नसल्याचे निदर्शनास आले. टीसीकडून सिंह यांना दंड भरण्यास सांगताच आपण आयकर खात्याचे अधिकारी असल्याचे सांगितले व टीसीसोबत वाद घालण्यास सुरुवात करत दंड भरण्यास नकार दिला. या वादात सिंह यांनी टीसी गुप्ता यांच्या कानाखाली मारली. त्यानंतर गुप्ता यांच्या मदतीला अन्य टीसी आले व त्यांना टीसींच्या कार्यालयात येण्यास सांगितले. अखेर त्यालाही नकार दिल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना बोलावून त्यांना लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)
आयकर अधिकाऱ्याची टीसीला मारहाण
By admin | Updated: October 10, 2016 06:14 IST
एका आयकर अधिकाऱ्याने सीएसटी स्थानकातील टीसीला मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेत लोहमार्ग पोलिसांकडून मारहाण
आयकर अधिकाऱ्याची टीसीला मारहाण
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}