शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मराठा मूक मोर्चा बोलू लागल्यास क्रांती - रावसाहेब कसबे

By admin | Updated: October 10, 2016 21:22 IST

मराठा क्रांती मुक मोर्चात लाखोंच्या संख्येने गरीब, कष्टकरी , शेतक-यांची मुले सहभागी होत असून मोर्चातील तरुण पुढा-यांच्या विरोधात बोलतील म्हणून त्यांना बोलू दिले

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 10 - मराठा क्रांती मुक मोर्चात लाखोंच्या संख्येने गरीब, कष्टकरी , शेतक-यांची मुले सहभागी होत असून मोर्चातील तरुण पुढा-यांच्या विरोधात बोलतील म्हणून त्यांना बोलू दिले जात नाही. परंतु, मराठा क्रांती मुक मोर्चा बोलेल त्या दिवशी क्रांती होईल,असे मत ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, कॅनडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल मिशन तसेच फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त ह्यबौध्द धम्म: 60 वर्षाचा प्रवास एक आकलन ह्णया विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी रावसाहेब कसबे बोलत होते. कार्यक्रमास माजी अतिरिक्त जिल्हा अधिकारी पंजाबराव वानखेडे, पुणे विभागीय पासपोर्ट कार्यालयाचे प्रमुख अतुल गोतसुर्वे, रोहिदास जाधव, विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे आदी उपस्थित होते.लोकशाहीच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक समानता आली नाही तर अराजकता येईल,असे भाकित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते,असे नमूद करून कसबे म्हणाले, समाजातील आर्थिक विषमतेमुळे राज्य भरात मराठा क्रांती मोर्चे काढले जात आहेत.परंतु, राज्याची सत्ता काही मोजक्या घराण्यांच्या हातात आहे. मराठा क्रांती मुक मोर्चाला बोलूता येत नाही. त्यामुळे मोर्चात सहभागी होणा-या तरुणांची फसवणूक होत आहे.मात्र,ज्या दिवशी मोर्चा बोलू लागेल त्या दिवशी क्रांती होईल.