शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 06:54 IST

गुन्हा दाखल केल्यानंतर लाऊड स्पीकर जप्त करावेत आणि तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करावे, असे या आदेशात म्हटले आहे.

मुंबई : धार्मिक स्थळांवरील भोंगे आणि त्यांच्या आवाजाच्या मर्यादेबाबत उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास संबंधितांना आधी ताकीद द्या आणि पुन्हा उल्लंघन केले, तर गुन्हा दाखल करा, असे आदेश राज्याच्या पोलिस महासंचालकांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत.महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम १३६ अन्वये असा गुन्हा दाखल केल्यानंतर लाऊड स्पीकर जप्त करावेत आणि तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करावे, असे या आदेशात म्हटले आहे. दिवसा आणि रात्री औद्योगिक, व्यावसायिक, निवासी आणि शांतता क्षेत्रात किती डेसिबलपर्यंत भोंग्यांचा आवाज असावा, याचे कोष्टक आदेशात देण्यात आले आहे. तक्रार आल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हे ध्वनीमापक यंत्र घेऊन घटनास्थळी भेट देतील. तेथे दोन पंचांसमक्ष ध्वनीची पातळी मोजली जाणार असल्याचेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

३ महिन्यांच्या कारावासाची तरतूदकलम १३६नुसार दाखल या गुन्ह्यात ३ महिन्यांपर्यंतचा कारावास आणि पाच हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत गुन्हा दाखल करण्यात आल्यास पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये एक लाख रुपये दंड व पाच वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

आदेशात काय?कोणत्याही अनधिकृत वास्तूत लाऊड स्पीकर लावण्याची परवानगी देऊ नये. ही परवानगी कोणत्या उद्देशाने मागितलेली आहे, हे पोलिस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासावे. कोणत्याही पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनधिकृत भोंगे आढळल्यास प्रभारी अधिकाऱ्यास जबाबदार धरले जाईल. पोलिस अधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रातील लाऊड स्पीकरबाबतचा अहवाल दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) यांच्याकडे पाठवावा.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस