"स्वराज्याकडे दुर्लक्ष झाले तर दुसरेच येऊन राज्य करतात"; सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर, अमोल मिटकरी यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 18:23 IST2026-01-31T18:22:25+5:302026-01-31T18:23:50+5:30
'स्वराज्य दुर्लक्षित झालं, तर दुसरेच येऊन राज्य करतात'," असेही मिटकरी यांनी म्हटले आहे.

"स्वराज्याकडे दुर्लक्ष झाले तर दुसरेच येऊन राज्य करतात"; सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर, अमोल मिटकरी यांचं मोठं विधान
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर, आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याच बरोबर त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. यानंतर, "लोक काय टीका-टिप्पणी करतात? या पेक्षाही, तो पक्ष सांभाळणे महत्वाचे आहे. या दुःखाच्या क्षणी सर्वांना सावरणे महत्वाचे होते. म्हणून सुनेत्रा वहिनींनी अत्यंत जड अंतःकरणारे हा निर्णय घेतलेला." तसेच, दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणासंदर्भात बोलताना, 'स्वराज्य दुर्लक्षित झालं, तर दुसरेच येऊन राज्य करतात'," असेही मिटकरी यांनी म्हटले आहे.
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर एबीपी माझासोबत बोलताना मिटकरी म्हणाले, "दादांची कमी कधी भरून निघणार नाही. आमच्यासारखे अनेक लोक वाट बघत होते. पण ठीक आहे, सुनेत्रा वहिनींनी शिवधनुष्य उचलले आहे. आज आम्ही दादांना मीस केलं."
या शपथविधीसंदर्भात 'एवढी घाई कशासाठी?' अशी टीकाही होत होती. यासंदर्भात बोलताना मटकरी म्हणाले, "शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ लोकांनी घेतलेला हा निर्णय आहे. त्यांनी पार्लमेंटरी बोर्डात घेतलेला हा निर्णय आहे. आम्हाला आमदार म्हणून तो पाळावाच लागेल. लोक काय टीका टिप्पणी करतात, या पेक्षाही तो पक्ष महत्वाच आहे. तो पक्ष सांभाळणे महत्वाचे आहे. या दुःखाच्या क्षणी सर्वांना सावरणे अत्यंत महत्वाचे होते. त्यामुळे सुनेत्रा वहिनींनी अत्यंत जड अंतःकरणारे हा निर्णय घेतलेला आहे."
सध्या राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनी करणासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांचे विलिनीकरण व्हावे अशी अजित दादांची इच्छा होती, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या आमदारांकडून बोलले जात आहे. यावर बोलताना मिटकरी म्हणाले, "विलिनीकरणाच्या चर्चा अणेकदा होत्या. सर्वांनाच वाटत होते की दोन्ही पक्ष एकत्र यायला हवेत. मात्र, वरिष्ठ नेते ठरवतील काय ते. मी यावर बोलावं एवढा मोठा नाही."
मिटकरी पुढे म्हणाले, "पक्ष एकत्र यावा अशी आपलीही इच्छा आहे. पक्ष एकत्र असायलाच हवा. साहेब आणि आम्ही एकत्र असायलाच हवे. पक्ष एकत्र असला म्हणजे, दुसरे लोक पक्षात घुसखोरी करणार नाही. एवढेच नाही तर, 'स्वराज्य दुर्लक्षित झालं, तर दुसरेच येऊन राज्य करतात,' असेही मिटकरी म्हणाले."