शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’चे तुकडे पाडाल तर अराजकता

By admin | Updated: October 28, 2015 02:10 IST

कायद्याने शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देणे बंधनकारक असताना, दोन-तीन टप्प्यांत ‘एफआरपी’चे पैसे देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्यता देणार असतील

कोल्हापूर : कायद्याने शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देणे बंधनकारक असताना, दोन-तीन टप्प्यांत ‘एफआरपी’चे पैसे देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्यता देणार असतील, तर राज्यात ऊसदरावरून अराजकता माजेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. कायद्याचे पालन करण्यास सांगणारेच कायदा मोडण्यास निघाले, तर सामान्य माणसाने न्याय कोणाकडे मागायचा? ज्यांना कायद्यात दुरुस्ती करण्याचाही अधिकार नाही, तर मग कायदा बदलणारे देवेंद्र फडणवीस कोण? असा सवालही त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना, ‘एफआरपी’चा कायदा हा केंद्रातील तत्कालीन कॉँग्रेस सरकारने केलेला आहे. तो करताना ऊसाच्या भाव गृहीतकावर निश्चित केला जातो. तो बाजारातील साखरेच्या भावाशी निगडित नाही, ही मूलभूत चूक झाली आहे. त्यामुळे या कायद्यात बदल करणे गरजेचे असून, जर साखर कारखान्यांच्या सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन दोन-तीन टप्प्यांत एफआरपी देत असतील तर त्यास हरकत नसल्याचे मत व्यक्त केले होते.ऐन हंगामाच्या तोंडावर शेतकरी व कारखानदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करणारे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करणे उचित नव्हते. (प्रतिनिधी)